bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03573
जिवलग ग्रुप घोटगाव चा लाडका राजा

आमच्या घोटगाव गावामध्ये 1995 पासून गणपती आगमनाला सुरुवात झाली ते आतापर्यंत चालूच आहे. गौरी गणपती चा सण हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तसं बघितलं तर बाप्पाला आगमनाची तयारी 1 महिना अगोदर पासून सुरुवात होते. त्यामध्ये मूर्ती, मकर, सजावट, इत्यादी ची सुरुवात अगोदर पासून होते. तसं बघितलं तर आमच्या घोटगाव गावामध्ये अनेक सण साजरे केले जातात पण हा एकच सण गौरी गणपती चा आहे का जो 11 दिवस साजरा केला जातो. गणेश चतुर्थी सांगितली की सर्वाना खूप आनंद होतो. कारण जो तो आपल्या लाडक्या बाप्पाची वर्ष भर वाट बघत असतो. तसं बघितलं तर आमच्या कडे खूप साऱ्यांकडे दीड दिवस गणपती बाप्पाचे आगमन होते. पण खरी मज्या असतें ती 11 दिसाच्या गणपती ची आता पर्यंत 30 वर्ष गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. अगोदर आमच्या कडे घरी 7 दिवसाचे बाप्पाचे आगमन असायचे त्यामध्ये वाजत गाजत बाप्पाला आणून त्याची खूप सेवा करायची. सकाळी 7.00 वाजता बाप्पाची आरती दुपारी 12.30 आणि संध्याकाळी 7.00 वाजता आरती अश्या तीन आरत्या होयाच्या. आरती झाली का प्रसाद वाटप त्या नंतर परंपरा गत केळीच्या पानावरचं जेवण. पण काही सांगा केळीच्या पानावरचं जेवण जेवायला मज्जाच वेगळी. संध्याकाळी आरती च्या नंतर जेवण झाला का खरी मज्या चालू होते. वेगवेगळ्या प्रकार गौरी - गणपती गाणी सांगून नृत्य त्यामध्ये तारपा नृत्य आणि छोटया मोठ्या मुलांची ड्रेससिंग बगायला खूप बरं वाटते. नाचण्याचा सकाळी पर्यंत चालूच असतो. पण आता आमच्याकडे 7 वर्ष झाली आता बाप्पाचे 11 दिवसाचे आगमन असतें 7 दिवस असायचा तर खूप कमी एन्जॉय करायला मिळायची म्हणून आता 11 दिवसाचे आगमन असतो. गणपती विसर्जन साठी पण सुंदर वाहत्या पाण्याची जागा आहे. अतिशय सुंदर पाणी आणि विसर्जन रॅली पण खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली जाते. गणपती विसर्जन साठी बँड लावून सर्व महिला, पुरुष आणि छोटी मुलं खूप नाचुन बाप्पाला निरोप दिला जातो.
- Kind
- Story
- Place
- Palghar
- Art
- Dance (Nṛtyam) · Kala 7
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3583 in a hash chain of 3,583. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash69c75ee134ef2e9acbe76cf49b3c36ba3044bce3ea7707a25ab2c81ae35b8b26
Chain head69c75ee134ef2e9acbe76cf49b3c36ba3044bce3ea7707a25ab2c81ae35b8b26
The chain verifies end to end as of this page load.


