bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03572
ग्रामपंचायत खारबाव

खारबाव गावचे गणेश उत्सव आणि संस्कृती, परंपरा आणि बाप्पा वरची श्रद्धा हे पिढ्यान् पिढ्या चालले आणि सर्व गाव एकत्र होऊन विसर्जन... गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहेत्याची प्रतिमा संपूर्ण भारतभर आढळते. अनेक हिंदू संप्रदाय आपल्या संलग्नतेची पर्वा न करता या देवाची पूजा करतात. गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. जैन आणि बौद्ध धर्मांमध्येही तो पूजला जातो.जरी गणेशाचे अनेक गुणधर्म असले तरी तो त्याच्या हत्तीच्या डोक्याच्या आकारामुळे सहज ओळखला जातो.तो मोठ्या प्रमाणावर आदरणीय आहे, विशेषतः अडथळे दूर करणारा (विघ्नहर्ता) आणि नशीब आणणारा देव म्हणून तो ओळखला जातो. कला आणि विज्ञानाचा संरक्षक; तसेच बुद्धी आणि शहाणपणाचा देव म्हणून गणपती प्रसिद्ध आहे. सुरुवातीसाठीचा देव म्हणून, त्याला संस्कार आणि समारंभाच्या सुरुवातीला सन्मानित केले जाते. लेखन सत्रादरम्यान अक्षरे आणि शिक्षणाचा संरक्षक म्हणून गणेशाचे आवाहन केले जाते. अनेक ग्रंथ त्याच्या जन्म आणि पराक्रमांशी संबंधित पौराणिक कथा सांगतात.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3582 in a hash chain of 3,582. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashbbeca73b1882cd5a0633112554e32ca6f2de7719504932f9513fc0a036780754
Chain headbbeca73b1882cd5a0633112554e32ca6f2de7719504932f9513fc0a036780754
The chain verifies end to end as of this page load.


