bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03570
ऋषी पंचमीची पंत्रस भाजी
वर्षातून एकदाच चाखायला मिळते ऋषीची भाजी जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने ऋषीपंचमी साजरी गणरायाचे आगमन सोमवारी १४ सप्टेंबर रोजी घरोघरी मोठ्या उत्साहात झाले आहे. गणेशोत्सव काळात महिलांचाही हरतालिका, ऋषी पंचमी, गौरी पूजन सण येत असतात. गणरायाचे आगमन झाल्यानंतर दुसरा दिवस हा ऋषी पंचमी दिवस म्हणून महिला वर्ग साजरा करतात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे सात भाज्यांची केलेली चवदार ऋषीची भाजी. ही भाजी फक्त गणेशोत्सव सणात चाखायला मिळते. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्य या भाजीची चव चाखण्याच्या प्रतीक्षेत असतो. मंगळवारी अनेकांना या पारंपरिक ऋषीच्या भाजीची चव चाखायला मिळाली. भाद्रपद मुख्यत्वे करून ओळखला जातो तो गणेशोत्सवासाठी. भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरितालिका पूजन करण्याची परंपरा आहे. यानंतर चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते आणि भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मंगळवारी ऋषी पंचमी जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने महिला वर्गाने साजरी केली. ऋषी पंचमी दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळा माठ( भाजी) चिंच, या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. यांतली कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते. त्याचबरोबर पायनु तांदूळ पासून भात, मिरची आणि नारळ पासून चटणी बनवली जाते. महिला हे व्रत करताना न बोलता ऋषी भाजी, भात आणि चटणी याचा आहार करतात. ऋषी पंचमीला करण्यात येत असलेली भाजी ही वर्षातून एकदाच चाखायला मिळत असल्याने घरातील गृहिणी सह इतर सदस्यही या भाजीचा आस्वाद चाखतात. गणेशोस्तव काळात गणरायासाठी विविध पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. या काळात विविध भाज्या घरात शिजविल्या जातात. गणेशोत्सव काळातच पंतरस असलेली ऋषीची भाजी खाण्याचा योग वर्षभराने येत असतो. एरवी ही भाजी केली जात नाही. त्यामुळे ऋषीची भाजी ऋषी पंचमीलाच खाण्यास मिळत असल्याने खवय्ये ही भाजी खाण्यासाठी आतुर असतात. महिला वर्गाची पूजा झाल्यानंतर भाताबरोबर ही भाजी वाढली जाते. ही आंबट , तुरट भाजी भात आणि नारळाच्या चटणीसोबत खाण्यास एक वेगळीच मजा मिळत असते.
- Kind
- Recipe
- Place
- Raigad
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3580 in a hash chain of 3,582. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashca4c127dbe8a53228b65d5f60daf8a8b09df397c3ac16c43196c6cccbc82f47a
Chain headbbeca73b1882cd5a0633112554e32ca6f2de7719504932f9513fc0a036780754
The chain verifies end to end as of this page load.


