bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03569
Maza ladaka bappa

आपल्या भारतात, हिंदू संस्कृतीत असंख्य देव आहेत. सृष्टीतल्या जवळपास सर्व तत्वांची एक एक देवता आहे. प्रकृतीतल्या हरेक तत्वांना सामावून घेणाऱ्या ह्या सर्व देवतांमध्ये एक देव असा आहे जो अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांना प्रिय आहे, उत्तर खूप सोप्प आहे, आपला "सर्वांचा लाडका गणपती बाप्पा" सर्व विघ्नाचा नाश करणारा “विघ्नहर्ता”, भक्तांना सर्व सुख प्रदान करणारा “सुखकर्ता”, सर्वांना आनंद देणारा देव म्हणजे "गणपती बाप्पा". चौदा विद्या, चौसष्ट कलांचा स्वामी म्हणजे बाप्पा. सर्व गणांचा अधिपती म्हणजे आपला गणपती. कोणत्याही शुभकार्यात प्रथम मान गणेश पूजनाचा. त्याच्या पुजनाशिवाय तुमचे कोणतेही शुभकार्य फळाला जात नाही. गणपती बाप्पा कोणाला आवडत नाही सांगा. त्याचे रूप किती मोहक. गजमुखी मस्तक, मोठ्ठाले दोंद, मोठ्ठे मोठे कान, इवलेसे डोळे, मस्त झुलनारी सोंड किती मोहक वाटते. लहान मुलं तर बाप्पाची दिवानी असतात. अर्थात त्याला कारण बाल गणेश, माय फ्रेंड गणेशा असे एनिमेशनपट असतील. पण माझ्या लहानपणी असे चित्रपट, किंवा कार्टून आले नव्हते. तरीही बाप्पा बद्दल प्रचंड आकर्षण होते. गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता त्यामुळे त्याची प्रार्थना केली की आपण हुशार होऊ असा एक बाळबोध समज मनात होता. शिवाय आपल्या पुराणातल्या सुरस अश्या अनेक गणेश कथांनी माझ्या बालमनाला गणेशाच्या प्रेमात पाडलं. केवळ आईच्या आज्ञेसाठी आपल मस्तक उडवून घेणारा "मातृभक्त" गणपती बाप्पा माझ्या हृदयात खोल रुजला. गणेशभक्ती कोवळ्या वयातच अंगात रुजली ती आजतागायत कायम आहे.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3579 in a hash chain of 3,579. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash44af14a19c7c669ebd4fac4cfcf21c214f5896eb3255bda608f4ee111afc8ec2
Chain head44af14a19c7c669ebd4fac4cfcf21c214f5896eb3255bda608f4ee111afc8ec2
The chain verifies end to end as of this page load.


