bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03561
modak

सारण बनवणे: कढईत १ चमचा तूप गरम करून त्यात खसखस थोडी परतून घ्या. त्यात गवलेला नारळ आणि बारीक चिरलेला गूळ घाला. मंद आचेवर मिश्रण एकत्र हलवत राहा. गूळ वितळून मिश्रण एकजीव होईपर्यंत (सुमारे ५-७ मिनिटे) परता. सारण जास्त सुकू देऊ नका, नाहीतर कडक होईल. शेवटी वेलची-जायफळ पूड घालून मिक्स करा आणि गॅस बंद करून सारण थंड होऊ द्या. २. उकड काढणे: एका भांड्यात १ कप पाणी, १/२ चमचा तूप आणि चिमूटभर मीठ घालून उकळी येऊ द्या. पाणी उकळल्यावर गॅस मंद करा आणि त्यात १ कप तांदळाचे पीठ घाला. लाटण्याने किंवा चमच्याने पीठ पाण्यात पटकन मिक्स करा. झाकण ठेवून मंद आचेवर २ ते ३ मिनिटे वाफ काढू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. हे गरम पीठ एका परातीत काढून घ्या. हाताला थोडे थंड पाणी लावून पीठ छान मऊ मळून घ्या. (पीठ मऊ मळले तर मोदक फुटत नाहीत). ३. मोदक वळणे: मळलेल्या पिठाचा लिंबाच्या आकाराचा गोळा घ्या. हाताला थोडे तूप किंवा पाणी लावून गोळ्याची पारी (वाटीसारखा आकार) तयार करा. कडा पातळ आणि मधला भाग थोडा जाड ठेवावा. अंगठा आणि शेजारच्या बोटांच्या साहाय्याने वाटीला ५ ते ७ कळ्या (पाकळ्या) पाडा. तयार वाटीत १ ते १.५ चमचा सारण भरा. सर्व कळ्या एकत्र आणून वरच्या बाजूने बंद करा आणि मोदकाचा टोकदार आकार द्या. (कळ्या पाडणे कठीण वाटत असल्यास तुम्ही मोदकाच्या साच्याचा वापर करू शकता.) ४. मोदक वाफवणे: चाळणीला थोडे तूप लावा किंवा त्यावर सुती ओला कपडा/केळीचे पान ठेवा. तयार केलेले मोदक थोड्या थोड्या अंतरावर ठेवा. मोदकांवर पाण्याचा शिडकावा मारा. एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यावर ही चाळणी ठेवा आणि झाकण लावून मध्यम आचेवर १० ते १२ मिनिटे मोदक वाफवून घ्या. वाफवल्यानंतर मोदकांवर छान चमक येते.
- Kind
- Recipe
- Place
- Thane
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3571 in a hash chain of 3,897. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashbeeca222c34a427b3d04c287517e5cef6cbd19025c57b9025aec8ada6da765e5
Chain heade7b98c0c3c2f5eee55c7dcbfaffecd9418533ea7817bd2a388d0c34371cc0d34
The chain verifies end to end as of this page load.


