bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03559
गोफ लेझीम परंपरा
श्री गणेश शाहूनगर मित्र मंडळ, यांच्या मार्फत गेली 48 वर्ष सलग लेझीम आणि गोफ ह्या प्रकारची परंपरा सुरू आहे. गोफ लेझीम ह्या प्रेम प्रकारात 16 दोऱ्या एक पाईप ला गोलाकार आकारात बांधण्यात येतात आणि त्याला खाली त्याच 16 दोऱ्यानि 16 लोक लेझीम खेळून ते गुंफतात. अर्धे गुंफून झाले की त्यात नारळ लावण्यात येतो आणि परत लेझीम खेळून गुंफले जाते. आणि परत लेझीम खेळून गोफ सोडण्यात ही येतो , असा आगळा वेगळा लेझीम चा प्रकार संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात फक्त श्री गणेश शाहूनगर मित्र मंडळ जळगाव ह्यांच्या मार्फतच खेळला जातो ज्यात तरुणींचा विशेष सहभाग मंडळातर्फे राबवला जात आहे
- Kind
- Tradition
- Place
- Jalgaon
- Art
- Dance (Nṛtyam) · Kala 7
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3569 in a hash chain of 3,570. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash39a767b5109e8f0f423a598f2964c3fa8b9d16172716f351770bafcc1a3d9d1f
Chain head51db97f5e9ec84183f0cc1ffa21cf68f4b34816eafd2e4d2585bf0f496df5bef
The chain verifies end to end as of this page load.


