bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03539
ओवळी चा गणेशोत्सव

ओवळी ग्रामपंचायत च गणेशोत्सव हा दीड, पाच, सात, दहा दिवसापर्यंत साजरा केला जातो. या उत्सवामध्ये सर्व धर्म, पंथ, समुदाय चे लोक एकत्र येऊन अगदी आनंदाने हा सण साजरा करतात. या सणाला 40 वर्षापासूनची जुनी परंपरा आहे. या काळात भजन, कीर्तन, सोहळा आयोजित केला जातो. गणपती विसर्जन सोहळा तितक्याच दिमाखात पार पाडला जातो. गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी गावा मधेच एक नैसर्गिक तलाव आहे. गणेश घाट आहे. या काळात गणेश घाट सुशोभीकरण केला जातो. निर्माल्य ठेवण्यासाठी बाहेर निर्माल्य कलश ची व्यवस्था केली आहे. अशा प्रकारे अतिशय भक्तिभावाने गणपती विसर्जन दिवशी साश्रू नयनांनी बाप्पा ना निरोप दिला जातो. आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रेमळ विनंती केली जाते. अशा प्रकारे ओवळी गावात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो...
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3552 in a hash chain of 3,900. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2142e60aa21afe55683410d5692a5c7739a91796954fc447a3760964a1763ca4
Chain headaccd69ea38a5d927c9c9987d724b13ef08cc0ae7ac10e0e073e25abd6d1e56bb
The chain verifies end to end as of this page load.


