bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03537
बेसन लाडू
कढईत तूप गरम करणे: एका जाड बुडाच्या कढईत साजूक तूप गरम करायला ठेवा.२. बेसन भाजणे: तूपात रवाळ बेसन घालून मध्यम ते मंद आचेवर सतत हलवत राहा.३. सुगंध सुटेपर्यंत भाजणे: बेसन भाजताना सुरुवातीला कोरडे वाटेल, पण जसे ते भाजले जाईल तसे तूप सुटू लागेल आणि छान खमंग सुवास येईल (सुमारे १५ ते २० मिनिटे).४. ड्रायफ्रूट्स घालणे: बेसन चांगले भाजत आल्यावर त्यात काजू-बदामचे तुकडे घाला, जेणेकरून तेही बेसनासोबत छान परतले जातील.५. मिशन थंड करणे: बेसन हलके सुवर्ण रंगाचे आणि हलके झाल्यावर गॅस बंद करा. मिश्रण एका ताटात काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.६. साखर व सुवासिक पूड मिसळणे: मिश्रण कोमट किंवा पूर्ण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून हाताने किंवा चमच्याने नीट एकजीव करा.७. लाडू वळणे: तयार मिश्रणाचे दोन्ही हातांनी गोल-गरगरीत लाडू वळून घ्या. मध्यभागी हवं असल्यास मनुका लावा.
- Kind
- Recipe
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3547 in a hash chain of 3,559. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash274176f8159ef2262beffc9f4c29fa6601eb669a5c1263618aa5f381dfb8bce4
Chain headb5788d46f1490e3cbcdb50c1c83cc61580db892b36d952ede523c6fff6c3ca63
The chain verifies end to end as of this page load.


