bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03528
खोणीचे गणपती बाप्पा

खोणीचे गणपती बाप्पा भक्तीची जोड अन् आरोग्याचा ध्यास, खोणी हद्दीत रचला नवा इतिहास... " आरतीचा सूर, सोबत सेवेचे वाण, गणेशोत्सवात जपले प्रत्येक माणसाचे प्राण!" खोणी गावात भक्तीमय वातावरण; आमच्या गावत बाप्पाचे दिड दिवासाचे ५५, पाच दिवासचे ९८, दहा दिवसाचे १८ गणपती येतात त्यांच्या आगमनाच्या दिवसशी पुर्ण गाव हा ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे आणले जातात. त्यांच्या आगमनासाठी ग्रामपंचायत मार्फत सर्व स्ट्रीट लाईट व रस्ते दुरुस्ती केली जाते. सर्व गावाची सफाई केली जाते.आरोग्य शिबिर, रक्तदान-आरोग्य जनजागृती, भजन व समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल.खोणी ग्रामपंचायत गावांमध्ये यंदाचा गणेशोत्सव अत्यंत भक्तीभावात, उत्साहात आणि सामाजिक भान जपत साजरा केला जात आहे.कौटुंबिक स्थापनेसोबतच सामूहिक पद्धतीने श्रींचे आगमन झाले असून संपूर्ण परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. खोणी, गावांत घुमला एकच भक्तीचा गजर!" नाही कुठे भेद, नाही नात्यांत अंतर, एकतेने विणला इथे संस्कृतीचा पदर...." विविध समाजउपयोगी व सांस्कृतिक उपक्रम यंदाच्या गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक विधींसोबतच अनेक समाजउपयोगी उपक्रमांवर दिलेला भर: मोफत महाआरोग्य शिबिर: उत्सवाचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी मोफत पूर्ण शरीर तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषध वाटप आणि शुगर टेस्ट यांसारख्या आरोग्यविषयक समाजउपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. " आरोग्याची सेवा हीच खरी देवपूजा, साधियला गावाने हा परोपकार दुजा...." सामाजिक व शैक्षणिक उपक्रम: गावा मध्ये गणपती बप्पा दहा दिवस मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जसेकी भजन, किर्तन, महिलांची खेल(होम मिनिस्टर), रक्तदान शिबीर, पुरुषांचे खेलांचे आयोजन केले जातात. त्यांना बक्षीस वाटप केले जाते. कला, क्रीडा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला स्पर्धा, मंगळागौर, हळदी-कुंकू, भक्तीमय भजनांचे कार्यक्रम, हरिपाठ व महाप्रसादाचे आयोजन करून सामाजिक एकोप्याची परंपरा जपली जात आहे. " भजन-हरिपाठाने पावन झाले मन, महाप्रसादाने रंगला हा भक्तीचा सण!" शाळकरी मुलांचा सृजनशील उपक्रम आणि पर्यावरण जनजागृती शालेय विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणाचा संदेश देत विशेष पुढाकार घेतला: पानांचा गणपती व उपक्रम: शाळेमध्ये ' आनंददायी शनिवार' उपक
- Kind
- Story
- Place
- खोणी,ता.भिवंडी,जि.ठाणे.
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3538 in a hash chain of 3,538. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash57c369a35f0c9155764b87399857ea1bfb2600409be63f8921df034f6e4b1843
Chain head57c369a35f0c9155764b87399857ea1bfb2600409be63f8921df034f6e4b1843
The chain verifies end to end as of this page load.


