bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03527
खमंग पुरणपोळी
डाळ शिजवून घेणे: प्रथम चणा डाळ कुकरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या काढून मऊ शिजवून घ्या. शिजलेली डाळ पुरणयंत्रात किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.२. पुरण तयार करणे: कढईत वाटलेली डाळ आणि चिरलेला गुळ एकत्र करून मंद आचेवर ढवळत राहा. मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात सुंठ, वेलची आणि जायफळ पूड घाला. पुरण तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या.३. कणीक भिजवणे: मैदा किंवा गव्हाच्या पिठात थोडे मीठ, हळद आणि तेल घालून मऊ कणीक मळून घ्या. त्यावर थोडे तेल लावून अर्धा ते एक तास झाчыून ठेवा.४. पोळी लाटणे: पिठाची छोटी गोळी घेऊन ती थोडी लाटून घ्या. त्यात पुरणाचा गोळा भरा आणि कडा बंद करा. हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्या.५. शेकणे: तापलेल्या तव्यावर पोळी टाका. दोन्ही बाजूंनी खमंग आणि मऊ होईपर्यंत तूप किंवा तेल लावून नीट शेकून घ्या.
- Kind
- Recipe
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3537 in a hash chain of 3,538. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash921b5762cbab53f14ea8a16421547ceb3ed25c0b53352664ef8af771a18c2db7
Chain head57c369a35f0c9155764b87399857ea1bfb2600409be63f8921df034f6e4b1843
The chain verifies end to end as of this page load.


