bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03521
गोष्ट गणेशउत्सवाची राहनाळ गावाच्या परंपरेची

गणपती बाप्पा म्हटलं की मनात भक्ती, उत्साह, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले सुंदर क्षण आठवतात राहनाळ गाव हे भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध गाव आहे आमच्या गावात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्सवात लहान थोर महीला पुरुष सर्व आनंदाने या उत्सवात सहभागी होतात आणि गणपती सण मोठ्या आनंदाने साजरा करतात गणपती मध्ये भजन किर्तन हरिपाठ नाच गाणे व अशे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात व आमच्या गावची ओळख म्हणजे वारकरी संप्रदाय मध्ये अग्रगण्य आसे गाव आहे आमच्या गावामध्ये आनेक कलाकार आहेत गायक वादक तसेच किर्तनकार त्यामुळे आमच्या गावात नेहमी आनंदाचा व भक्तिमय वातावरण असतो , आणी गावात गणपती मध्ये घरोघरी जाऊन भजन केले जाते ही जुनी परंपरा खुप वर्षांपासून आहे आमच्या गावात सर्व लोक एकत्रित येऊन आणी गणपती बाप्पाला निरोप देत असताना गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषाने सर्व लोक गणपतीला निरोप देतात व संपूर्ण गावातून मोठ्या आनंदात व भक्तिमय वातावरणात बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुका काढल्या जातात व विसर्जनाचा सर्व आयोजन ग्रामपंचायत मार्फत मोठ्या जल्लोषात केला जातो व बाप्पांचा विसर्जन सुखरूप पने पार पाडला जातो असं आमच्या गावाची परंपरा आता पर्यंत सर्वांनी जपली आहे
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3531 in a hash chain of 3,532. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash348136f0c8dea8bde5f884c654219974f3773bdeebee37ddae12f71e69bd1863
Chain heade33282b59d0102401594842829777838f70c06c46b7ae9494bb736c5b6f5bd77
The chain verifies end to end as of this page load.


