bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03507
खानिवलीचा उत्सव, एकतेचा महोत्सव

या उत्सवाच्या निमित्ताने गावात एकीचे स्वरूप प्राप्त होते.जे लोक एकमेकांचे विरोधक असतात ते सर्व या उत्सवानिमित्ताने एकत्र येऊन विरोध विसारतात व पूर्ण खानिवली गावात घरगुती गणेशोत्सवाला पारंपरिक रूप, गावच्या मातीशी घट्ट जोडलेली माणसं. याच मातीत गणेशोत्सवाची परंपराही वर्षानुवर्षे जपली जात आहे. भव्य मंडपांपेक्षा घराघरांत श्रद्धेने विराजमान होणारा गणपती हे खानिवली गावातील गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे.गणेश चतुर्थी जवळ आली की गावातील घरांमध्ये गणरायाच्या स्वागतासाठी धावपळ सुरू होते. घराची साफसफाई, देवघराची सजावट, बाप्पासाठी मकर आणि नैवेद्याची तयारीची सुरुवात होते. यामध्ये घरातील ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण सहभागी होतात. गणेशोत्सव हा सण केवळ पूजेपूरता मर्यादित नाही. गावची माणसं, नाती आणि परंपरा यांना एकत्र आणणारा हा उत्सव आहे. शेजारी-पाजारी एकमेकांच्या घरी आरतीसाठी जाणे, प्रसादाची देवाणघेवाण करणे आणि गणपती दर्शनाच्या निमित्ताने जुन्या काळात कशा पद्धतीने गणपती उत्सव साजरा करायचे ती पद्धत सांगताना तसेच गौरी-गणपती सणाच्या एक महिना अगोदर महिला घरोघरी नाचकाम करणे,अशा आठवणी मनमोकळे पणाने सांगून जुन्या आठवणींना उजाळा देणे ही गावच्या गणेशोत्सवाची खासियत आहे.गावातील ज्येष्ठ मंडळी आजही गणेशोत्सवातील जुन्या पद्धती पुढच्या पिढीला सांगतात. पूर्वीच्या साध्या पद्धतीतील उत्साह, घरच्या घरी तयार केला जाणारा नैवेद्य आणि सामूहिक आरतीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे बदलत्या काळातही खानिवली गावच्या घरगुती गणेशोत्सवाची गावकीची ओळख कायम आहे. भाद्रपद महिन्यात गणपतीसोबतच ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे आगमन होते. ग्रामीण भागात जंगलातील पारंपरिक गौरीपूजनासाठी वापरली जाणारी फुले आणून किंवा पारंपरिक मुखवट्यांची स्थापना करून गौरी पुजल्या जातात. बाप्पा विराजमान झाल्यानंतर आरतीवेळेस सर्व महिला व पुरुष आळीपाळीने बाप्पाची आरती घेत ओवाळणी करत असतात.तसेच बाप्पा असणाऱ्या प्रत्येकाच्या घरी गावकऱ्यांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते.गावातील लोक आपापल्या मधील वाद-विवाद विसरून सर्वजण एकत्र येऊन गणपती गाणी ढोलकीवर नाचकाम केले जाते.महिला पारंपारिक वेशभूषा करून झिम्मा फुगडी आणि मंगळागौरीचे खेळ खेळतात. खानिवली गावात दीड, पाच किंवा सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन गावात
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3517 in a hash chain of 3,520. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash073974384e3c1f3edf82dd871c71d42746b7c086dc16874cebeaf3974367eeb4
Chain headca5e9c30572a72f16a362a6798b35deec93d6191cb65960d63c8a48c8a735441
The chain verifies end to end as of this page load.


