bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03501
निंबवलीचा बाप्पा
निंबवली गावच्या काही परंपरा निंबवली हे गांव भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध गाव आहे .आमच्या गावात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो .या उत्सवात लहान थोर महीला पुरुष सर्व आनंदाने या उत्सवात सहभागी होतात आणि गणपती सण मोठ्या आनंदाने साजरा करतात गणपती मध्ये भजन किर्तन ,हरिपाठ ,नाच ,गाणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणी आमच्या गांवात आई वज्रेश्वरी मातेची यात्रा मोठ्या उत्सवात साजरी केली जाते . आमच्या गावामध्ये अनेक कलाकार आहेत गायक ,वादक आहेत आमचं गांव खुप वर्षांपासून गणपतीची परंपरा आहे. आमच्या गांवच वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावाला खुप निसर्गरम्य परिसर आहे आणी गावात गणपती मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होतो. प्रत्येक घरोघरी जाऊन आणी भजन केले जाते ही जुनी परंपरा खुप वर्षांपासून आहे. आमच्या गावात सर्व लोक एकत्रित येऊन आणी गणपती बाप्पाला निरोप देत असतात.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषाने सर्व लोक गणपतीला निरोप देतात. तसेच गांवातील गणपती विसर्जन करण्याकरिता टरापा ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून अनुचित प्रकार घडू नये तसेच गणपती बाप्पाची गावाची परंपरा आता पर्यंत सर्वांनी मनोभावे जपली आहे.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3511 in a hash chain of 3,516. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashc3c3abcbceab33d4de93f25f7f77fefee1a60d8e96cde77f74aa78b6f48112ce
Chain head492200dd40f0d111d83a05a4cf260dcb96869e8c7446b7e889198d1919e182b0
The chain verifies end to end as of this page load.


