bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03485
महापोली ग्रामपंचायत

📝 आमच्या गावातील बाप्पा: .आमच्या गावात बहुतांश लोक बौद्ध विचारसरणीचे आहेत, तर अर्धी वस्ती आमच्या मुस्लिम बांधवांची आहे. अशा या वेगवेगळ्या विचारांच्या आणि धर्माच्या गावात, दरवर्षी फक्त एकाच घरी गणपती बाप्पांचे आगमन होते!यातली सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे, ज्यांच्या घरी बाप्पा येतात ते कुटुंब स्वतः बौद्ध विचारसरणीचे (बुद्धिस्ट) आहे. पण, बाप्पांवर असलेली त्यांची अतुट श्रद्धा आणि घरात चालत आलेली परंपरा यामुळे ते दरवर्षी बाप्पांची मूर्ती अत्यंत प्रेमाने आणि भक्तीभावाने घरात आणतात. संपूर्ण गावातून बाप्पा केवळ त्यांच्याच घरी विराजमान होतात, हा त्या कुटुंबावर बाप्पांचा खूप मोठा आशीर्वाद आहे, असे मला वाटते.आमच्या गावात विचारांची आणि धर्माची विविधता नक्कीच आहे, पण त्या एका कुटुंबाने आपली श्रद्धा ज्या प्रकारे जपली आहे, ते खरोखरच मनाला भिडणारे आहे.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3495 in a hash chain of 3,497. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash59fea1ce9f7a2ebbc908f4a19a46204093912d848577e8c7f55307764fde72a3
Chain headc268912e0bf02cb2132ff0af2982dea9ca624cacef293d86ea36baeb70c219e5
The chain verifies end to end as of this page load.


