bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03459
संस्कृती,श्रद्धा आणि परंपरा जपणारा वेहेळे गावातील गणेशउत्सव

आमचे वेहेळेगाव सुंदर गाव आहे. आमच्या गावातील दोन जुन्या गणपती मंदिरांची वैशिष्ट्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, साधी आणि अध्यात्मिक शांतता देणारी आहेत. गावांमध्ये असलेल्या अशा जुन्या मंदिरांमध्ये संस्कृती आणि इतिहासाचा सुंदर वारसा पाहायला मिळतो. माझ्या वेहेळे गावच्या काही परंपरा आहेत. गावात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या उत्सवात लहान थोर महीला पुरुष सर्व आनंदाने या उत्सवात सहभागी होतात आणि गणपती सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. गावात प्रत्येक घरोघरी गणपती सण साजरा केला जातो. गावात भजन, किर्तन, हरिपाठ व नाच गाणे इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आणी आमच्या गावची ओळख म्हणजे वारकरी संप्रदाय मध्ये अग्रगण्य असे गाव आहे. आमच्या गावामध्ये अनेक कलाकार आहेत गायक वादक तसेच किर्तनकार, मूर्तिकार आमच्या गावाची खुप वर्षांपासून ची परंपरा आहे. आमच्या गावच वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावालगत उल्हासनदी वाहते खुप निसर्गरम्य परिसर आहे. आणी गावात गणपती मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण होतो प्रत्येक घरोघरी जाऊन भजन, आरती केली जाते. ही जुनी परंपरा खुप वर्षांपासून आहे आमच्या गावात सर्व लोक एकत्रित येऊन आणी गणपती बाप्पाला निरोप देत असताना वाजत गाजत व नाचत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषाने सर्व लोक गणपतीला निरोप देतात. अशी आमच्या गावाची परंपरा आता पर्यंत सर्वांनी जपली आहे. तसेच पुढे पण जपणार आहोत. गणपती बाप्पा मोरया !!!
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3469 in a hash chain of 3,469. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb189f0fe250223b89ad1a81a6729f391e009f2c8197e4bac3cf8c67def4f7f9c
Chain headb189f0fe250223b89ad1a81a6729f391e009f2c8197e4bac3cf8c67def4f7f9c
The chain verifies end to end as of this page load.


