bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03458
आमचा बाप्पा

आमचा बाप्पा मालबडी सूर्यानगर येथे विराजमान होतो. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे तसेच तो विघ्नहर्ता हे आहे त्यामुळे कुठले कार्य आरंभ करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते त्याशिवाय दरवर्षी हा दैवत महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते त्यालाच आपण गणेशोत्सव असे म्हणतो. आमच्याकडे दीड दिवस बाप्पा असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात गणेश मूर्तीची स्थापना करतो मग त्यांचे विधिवत पूजा करून आरती केली जाते आणि गणरायाला 21 मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. गणेश चतुर्थी हा महाराष्ट्र सह संपूर्ण भारतात मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण आहे आणि गणपती बाप्पा हे शुभकाराचे प्रतीक मांडले जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत आहे त्यामुळे गणेश चतुर्थीच्या धार्मिक तसेच सामाजिक आणि संस्कृती महत्त्व प्राप्त झाले आहे. बाप्पाची स्थापना झाली की सर्वजण आरती केली जाते. त्यामुळे घरातले वातावरण चांगले बनते सर्व कुटुंब एकत्र येतात. गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी मोदक केले जातात ते खाण्यासाठी लहान मुलं मोठी माणसं खूप उत्साहीत असतात. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्यात येते. गणपती बाप्पा मोरया 🙏
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3468 in a hash chain of 3,469. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5c38c7f18ccc4a69e5b349866ffc791ae4f5da083baa01949ec77a9ded9de055
Chain headb189f0fe250223b89ad1a81a6729f391e009f2c8197e4bac3cf8c67def4f7f9c
The chain verifies end to end as of this page load.


