bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03454
संस्कृती, श्रद्धा आणि ऐक्याचा अनोखा संगम , गोवे गावाचा आदर्श गणेशोत्सव

भिवंडी तालुक्यातील गोवे ग्रामपंचायत हद्दीतील गणेशोत्सव म्हणजे केवळ एक सण नसून तो सांस्कृतिक जपणूक, अध्यात्मिक ऊर्जा आणि सामाजिक एकतेचा भव्य सोहळा असतो. गोवे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गोवे हे एकच महसूल गावचा समावेश असून गावात नवसाला पावणारा स्वयंभू गणेश मंदिर आहे. गावातील लहान-थोर, महिला आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आपल्या लाडक्या गणरायाची अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा-अर्चा करतात. 🌻🛕अध्यात्मिक तेजाने उजळून निघणारे वातावरण गणेशोत्सवाचे दिवस संपूर्ण गोवे गावात एक वेगळीच अध्यात्मिक ऊर्जा प्रवाहित होत असते. दररोज संध्याकाळी होणारा हरिपाठ, भक्तिमय सुरांमध्ये रंगणारे भजन, प्रबोधनात्मक कीर्तन आणि मूल्यांची शिकवण देणारे प्रवचन तसेच महिलांचे पारंपारिक फेऱ्यांचे गाणी यांसारख्या अध्यात्मिक कार्यक्रमांमुळे गावातील वातावरण भक्तीने भारून जाते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून केवळ अध्यात्माचा प्रसार होत नाही, तर ग्रामस्थांमध्ये संस्कार आणि सकारात्मकतेची पेरणीही होते. 🤝सामाजिक एकता आणि अखंडतेचा वारसा👏 गोवे गावातील गणेशोत्सवाचा सर्वात सुंदर पैलू म्हणजे येथे दिसणारी सामाजिक समता. आरती असो वा प्रसादाचे वाटप, प्रत्येक कार्यात प्रत्येकाचा आवर्जून सहभाग असतो. आपल्या पूर्वजांनी जपलेली ही एकता, अखंडता आणि बंधुभावाची संस्कृती आजचे ग्रामस्थ पुढील पिढीकडे अत्यंत अभिमानाने सोपवत आहेत. आजच्या तरुणांना सहकार्याची आणि संघटन कौशल्याची शिकवण या उत्सवातून आपोआप मिळते. भावनिक निरोप: "चुकले आमचे काही देवा क्षमा असावी..." विसर्जनाच्या दिवशी सर्व ग्रामस्थ आपल्या डोक्यावर गणपती बाप्पांना घेऊन मिरवणुकीत सामील होतात. सदर मिरवणूक गोवे गावातील दुर्गामाता मंदिराच्या सभोवती फेरा मारून नंतर ही मिरवणूक ग्रामपंचायत गोवे हद्दीतील नवसाला पावणाऱ्या स्वयंभू गणेश मंदिराला फेरा मारून विसर्जन मिरवणुक गुलाल उधळत, ढोल-ताशांच्या गजरात नाचणारे भाविक जेव्हा विसर्जनाच्या क्षणी नदी किंवा तलावाकाठी पोहोचतात, तेव्हा सर्वांचे डोळे नकळत पाणावतात. " निरोप घेतो देवा तुमची आज्ञा असावी, * चुकले आमचे काही देवा क्षमा असावी* ✍️ शब्दांकन - सौ. पल्लवी पुंडलिक मानकर ग्रामपंचायत अधिकारी गोवे, ता. भिवंडी. जि.ठाणे. संपर्क – ९७६७५७४७८४.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3464 in a hash chain of 3,464. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashc9bc595060fd70200be94eb63f39f65a6b0ab55141417265a57c08889d93f099
Chain headc9bc595060fd70200be94eb63f39f65a6b0ab55141417265a57c08889d93f099
The chain verifies end to end as of this page load.


