bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03450
पर्यावरण पुरक गणेशोत्सव

🌿🙏 श्री गणरायाचे आगमन… पर्यावरणपूरक आणि मंगलमय! 🙏🌿 दरवर्षी प्रमाणेच यंदाचा आमचा गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून परंपरा, श्रद्धा आणि पर्यावरणसंवर्धन यांचा सुंदर संगम आहे. 🌱 🌺 श्रींची मूर्ती शाडूच्या नैसर्गिक मातीपासून घरीच साकारण्यात आली आहे. 🎋 सजावटीसाठी बांबू आणि कापडाचा पुनर्वापर करण्यात आला आहे. 🌿 सजावटीमध्ये नैसर्गिक झाडे व वनस्पतींचा वापर करून घरातील वातावरण अधिक प्रसन्न आणि निसर्गमय करण्यात आले आहे. मूर्ती व सजावटीसाठी शक्य तितक्या नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून प्लास्टिक, थर्माकोल आणि अनावश्यक कृत्रिम सजावटीला पर्याय देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. 🙏 गणपती बाप्पा हे बुद्धी, विवेक, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक आहेत. म्हणूनच बाप्पाच्या आगमनासोबत आपल्या निसर्गाचेही रक्षण करण्याचा संकल्प करूया. ✨ परंपरा जपूया… संस्कृती जपूया… निसर्गाचेही संवर्धन करूया! ✨ ♻️ पर्यावरणपूरक गणेशोत्सव — आजची गरज, उद्याची जबाबदारी! 🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺 🌿 मंगलमूर्ती मोरया! 🌿 🙏 ढवळे परिवार शशी-विश्व, विघ्नहर्ता नगर, वाशिम 🌿🙏 मनःपूर्वक आभार व प्रतिसाद 🙏🌿 ‘लोकमत’ने आमच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची घेतलेली दखल ही आमच्यासाठी आनंदाची आणि प्रेरणादायी बाब आहे. शाडू मातीची श्री गणेशमूर्ती, बांबू व कापडाचा पुनर्वापर, नैसर्गिक झाडे-वेलींची सजावट आणि प्लास्टिकमुक्त उत्सवातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. 🌱 गणरायाची भक्ती आणि निसर्गाचे संवर्धन यांचा सुंदर संगम घडविण्याचा हा प्रयत्न अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचावा, हीच अपेक्षा. ‘लोकमत’चे मनःपूर्वक आभार! 🌿 परंपरा जपूया… पर्यावरणही वाचवूया! 🌿 गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩
- Kind
- Story
- Place
- Washim
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3460 in a hash chain of 3,521. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash933892f44c65a36dfe9847adb4a752d465447c5d8f51636eff854c02ef525813
Chain head8f209fc259d691ea7b6b586ee2471e5e9011f750cd6c2eaea0eeda1f1b53416b
The chain verifies end to end as of this page load.


