bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03447
‘चारबंगल्याचा राजा’ – एका निरागस भक्तीचा ३४+ वर्षांचा प्रवास

‘चारबंगल्याचा राजा’ – एका निरागस भक्तीचा ३४+ वर्षांचा प्रवास आजपासून ३४ वर्षांहून अधिक काळापूर्वी, चार बंगल्याच्या परिसरातील एका झोपडपट्टीत राहणारा अवघा १२ वर्षांचा एक मुलगा श्रीगणेशाचा अतिशय मोठा भक्त. त्याला नीट बोलताही येत नव्हते… पण बाप्पावरील त्याची भक्ती मात्र शब्दांच्या पलीकडची होती. स्वतःच्या छोट्याशा हातांनी तो लाल माती गोळा करायचा आणि त्यातून आपल्या परीने श्रीगणेशाची मूर्ती साकारायचा. ती मूर्ती इतकी साधी आणि ओबडधोबड असायची की, ती गणपतीची मूर्ती आहे हे ओळखणेही कधी कधी कठीण व्हायचे. पण त्याच्यासाठी ती केवळ मातीची मूर्ती नव्हती… तो त्याचा बाप्पा होता! आपल्या घराबाहेर त्या छोट्याशा मूर्तीची स्थापना करून तो अत्यंत श्रद्धेने तिची पूजा करायचा. आजूबाजूचे लोक त्याची आणि त्याच्या मूर्तीची थट्टा करायचे. हसायचे. पण त्या हसण्याने त्याची भक्ती कधीच कमी झाली नाही. लोकांची थट्टा सुरू राहिली… पण त्याची श्रद्धाही तितक्याच निष्ठेने सुरू राहिली. आणि मग एक दिवस या छोट्याशा भक्तीला साथ मिळाली. त्याच परिसरातील त्याचे बालपणीचे मित्र — ‘सूर्या क्रिकेट टीम’. त्या वेळी आम्ही सगळेच अवघे ९ ते १२ वर्षांचे होतो. त्याची भक्ती पाहून आम्ही त्याची थट्टा करण्याऐवजी त्याच्या प्रयत्नांना हातभार लावण्याचे ठरवले. प्रत्येकाने आपल्या परीने थोडे थोडे योगदान दिले आणि त्या छोट्याशा प्रयत्नाला एकत्रितपणे मोठ्या स्वप्नाची दिशा मिळाली. सुरुवात झाली एका छोट्याशा १२ इंचांच्या लाल मातीच्या गणपतीपासून… आणि पुढे वर्षानुवर्षे त्या मूर्तीचा आकार वाढत गेला; पण त्याहूनही मोठी झाली ती बाप्पावरील श्रद्धा, प्रेम आणि भक्तांचा सहभाग. आज ३४ वर्षांहून अधिक काळानंतर, त्या छोट्याशा १२ इंचांच्या गणपतीचे रूपांतर झाले आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘चारबंगल्याचा राजा’ मध्ये. एका अशा मुलाच्या निरागस भक्तीपासून सुरू झालेला हा प्रवास आज मुंबईभर बाप्पाचे अस्तित्व, प्रेम आणि आशीर्वाद पोहोचवणाऱ्या एका मोठ्या भक्तीपरंपरेत रूपांतरित झाला आहे. ज्याला आपली भक्ती शब्दांत व्यक्त करता येत नव्हती, त्याची भक्ती आज हजारो भक्तांच्या भावनेतून व्यक्त होत आहे. ही केवळ एका गणेशमूर्तीची कहाणी नाही… ही कहाणी आहे निरागस भक्तीची, मैत्रीची, संघर्षाची, जिद्दीची आणि सामूहिक श्रद्धेची. ही कहाणी सांगते की भक्तीसाठी श्रीमंतीची गरज नसते, भव्यतेची गरज नसते,
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3457 in a hash chain of 3,462. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf5b121ac696714c9b8764b8262aacbde07f40045897e2ee6ff2793bafddb4c48
Chain head787a03744c318652cf9bc4671399458f651f9b9d233e77d9a9da4f5cca7ac3c8
The chain verifies end to end as of this page load.


