bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03440
माझा गणपती

माझे कडील गणपती हा मी वयाच्या पाचव्या वर्षाला असल्यापासून सुरू आहे माझे वडील हे बी एस सी ,एल टी ,एल एल बी, जुन्या काळाचे म्हणजे 1905 सालचे होते त्याकाळी एवढे शिकलेल्या व्यक्ती हात क्वचित सापडत असे तसेच त्यांचे गणित व विज्ञान या विषयावर प्रभुत्व होते व त्यामुळे त्यांचा देवावर जास्त विश्वास नव्हता परंतु त्यांना पाच मुली झाल्या व त्या वेळेला त्यांनी सहज असे म्हटले की जर मला मुलगा झाला तर मी गणपतीची स्थापना सुरू करीन व आश्चर्य म्हणजे त्यांना मी शेंडेफळ झाले व त्यांनी वचन दिल्याप्रमाणे गणपतीची स्थापना केली म्हणजेच माझे कडील गणपती हा जवळजवळ 70 वर्षात जुना आहे आमच्याकडे सोवळे आहे व त्यामुळे आमच्याकडे माझी आई व माझ्या बहिणी हे सर्व गणपतीची आरास व नैवेद्य करत असे आमचे कडे गणपतीची स्थापना चे दिवशी खव्याचे मोदक करण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे आमचेकडे महालक्ष्मी गौरी असल्याकारणाने सर्व स्वयंपाक हा माझी आई करायची व आमच्याकडे जेवायला कमीत कमी 70 ते 80 लोक राहत असे माझ्या वडिलांना जास्त गणपतीचं डेकोरेशन करायला आवडत नसेल म्हणून आम्ही लोकं झाडाची फांदी आणून किंवा फुल लावून गणपतीचे डेकोरेशन करत असेल व ही परंपरा अजूनही मी करत आहे व माझे नंतर माझा मुलगा माझे सोबत असल्यामुळे तो पण सुरू ठेवेल हा मला विश्वास आहे मी मूळचा रामटेक जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे माझा जन्म देखील रामटेकचा असल्याकारणाने माझं शिक्षण हे रामटेक व नागपूर येथे झालेले आहे
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Dipak UPADHYE
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3450 in a hash chain of 3,495. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4b0d2d067664c781092c6590026fb9fad13e7d0901ac8bc8d671e4469f90b6e2
Chain head59fea1ce9f7a2ebbc908f4a19a46204093912d848577e8c7f55307764fde72a3
The chain verifies end to end as of this page load.


