bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03439
माझा बाप्पा माझी श्रद्धा
गेली १० वर्षे माझा बाप्पा माझ्या घरी विराजमान होत आहे… 🙏🏻❤️ दहा वर्षे ऐकायला हा काळ जरी मोठा वाटत असला, तरी बाप्पासोबतचा प्रत्येक क्षण आजही तितकाच खास आणि मनाच्या जवळचा आहे. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी एका सुंदर आठवणीसारखा असतो. बाप्पासाठी केलेली तयारी, घराची सजावट, स्वतःच्या हाताने केलेली आरास, नैवेद्य, मोदक, आरती आणि बाप्पासमोर बसून केलेली मनापासूनची प्रार्थना… या सगळ्यात मिळणारं समाधान शब्दांत सांगणं खरंच कठीण आहे. गेली दहा वर्षे बाप्पा माझ्या घरी येतोय… पण खरं सांगायचं तर, तो फक्त माझ्या घरी येत नाही, तर माझ्या आयुष्यात आनंद, प्रेम, समाधान आणि सकारात्मकता घेऊन येतो. या दहा वर्षांत कितीतरी गोष्टी बदलल्या, आयुष्यात अनेक चढ-उतार आले, काही माणसं जवळ आली तर काही दूर गेली… पण बाप्पासोबतचं माझं नातं मात्र प्रत्येक वर्षागणिक आणखी घट्ट होत गेलं. कधी काही मागण्यासाठी बाप्पासमोर हात जोडले, कधी मनातलं दुःख त्याच्यासमोर सांगितलं, कधी एखादी इच्छा पूर्ण झाल्यावर त्याचे आभार मानले… आणि कधी काहीही न बोलता फक्त त्याच्याकडे शांतपणे पाहत बसले. माझ्यासाठी बाप्पा म्हणजे फक्त गणेशोत्सव नाही… तर बाप्पा म्हणजे माझ्या घराचा आनंद, माझ्या मनाची शांतता आणि माझ्या श्रद्धेचा एक सुंदर भाग आहे. 🙏🏻❤️ दरवर्षी बाप्पाच्या आगमनाची वाट पाहताना मनात एकच भावना असते. बाप्पा, तू यावंसं… काही दिवसांसाठी का होईना, पण माझ्या घरात तुझं अस्तित्व जाणवावं. आणि प्रत्येक वर्षी बाप्पा येतो… घर भरून जातं, मन भरून येतं आणि पुन्हा एकदा जाणवतं की, आपला बाप्पा आपल्या जवळ आहे. या दहा वर्षांच्या सुंदर प्रवासासाठी बाप्पाचे मनापासून आभार… 🙏🏻अशीच तुझी कृपादृष्टी माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहू दे. प्रत्येक वर्षी याच प्रेमाने, याच भक्तीने आणि याच उत्साहाने तुझं स्वागत करण्याचं भाग्य मला मिळू दे. माझा बाप्पा… गेली १० वर्षे माझ्या घरी विराजमान आहे आणि पुढची कितीतरी वर्षेही असाच माझ्या घराचा आणि मनाचा बाप्पा राहो. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌺🙏🏻❤️
- Kind
- Story
- Place
- Kolhapur
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3449 in a hash chain of 3,497. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash819722127ab4659ebd559e7a9fb52dcc8c3d27eac2c4dd5656c89fb63718ed8c
Chain headc268912e0bf02cb2132ff0af2982dea9ca624cacef293d86ea36baeb70c219e5
The chain verifies end to end as of this page load.


