bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03433
आमच्या दापोडे गावातील गणपती

माझ्या दापोडे गावात गणपती बाप्पाची परंपरा ही श्रद्धा, कुटुंब आणि गावच्या संस्कृतीशी जोडलेली आहे. घरचा गणपती अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या पद्धतीने आणला जातो. मातीची मूर्ती, गौरीचे आगमन, पारंपरिक नैवेद्य, आरती, भजन आणि विसर्जन यांना विशेष महत्त्व असते. काही वैशिष्ट्यपूर्ण प्रथा: 1) गणपतीचे घरच्या घरी जलोषयात स्वागत करणे. 2) उकडीचे मोदक, नारळ, पोळी अशा पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य करणे. 3) गणपतीसोबत गौरीचे आगमन आणि त्यानिमित्ताने विशेष पूजा करणे. 4) नातेवाईक आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन आरती करणे. 5) पारंपरिक पद्धतीने गणपती विसर्जन करणे. 6) काही कुटुंबांमध्ये गणपती दीड, पाच, सात किंवा दहा दिवसांचा असतो. तसेच ग्रामपंचायती कडून मखर सजावट स्पर्धा राबवली जाते. त्याच्यात उत्कृष्ट मखर व ईकोफ्रेंडली मखर सजावट यांना जास्त प्राधान्य दिले जाते. गावात १० दिवस घरोघरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पाहुणी मंडळी यांची वर्दळ असते. गणेश घाटावर सुंदर अशी सजावट केली जाते आणि पारंपरिक पद्धतीने गणपती विसर्जन केले जाते. विसर्जन घाटावर एकच आवाज घुमत असतो तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ..!
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3443 in a hash chain of 3,547. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb1b4e82940ff52912a8fc9ebbfa9e349100e24ffb9ffc65549401e0662f1ecdc
Chain head274176f8159ef2262beffc9f4c29fa6601eb669a5c1263618aa5f381dfb8bce4
The chain verifies end to end as of this page load.


