bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03427
देवरुंग गावाची एक गाव ,एक आरती ,एक विसर्जन.
#देवरुंग गावाचा आदर्श आणि ७७ वर्षांची अनोखी परंपरा! 🙏✨आज जिथे गणेश विसर्जनाच्या नावाखाली हजारो रुपयांची उधळण, मोठ्या डीजेचा गोंगाट आणि मंडळा मंडळांमधील स्पर्धा पाहायला मिळते... तिथे आमचं 'देवरुंग' गाव संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक वेगळा आणि आदर्श आदर्श ठेवतंय!गेल्या ७७ वर्षांपासून आमच्या देवरुंग गावाने आपली संस्कृती आणि एकजूट जपली आहे. आमच्या गावाचा एकच नियम आणि एकच मंत्र आहे— 'एक गाव, एक आरती, एक विसर्जन!' 🤝❤️आमच्या विसर्जनाचं वैशिष्ट्य काय?डीजे नाही, तर विठूचा गजर: विसर्जनाला निघताना आमचे पाय थिरकत नाहीत, तर भक्तीत लीन होतात. संपूर्ण गाव जेव्हा विसर्जनासाठी एकत्र निघतं, तेव्हा प्रत्येकाच्या मनात आणि मुखात 'हरिपाठ' सुरू असतो. टाळ-मृदंगाच्या आणि हरिपाठाच्या पवित्र सुरांमध्ये बाप्पाला निरोप दिला जातो. माऊलींच्या गजरात गाव भक्तीरसात न्हाऊन निघतं. 🎶🕉️एकच महाआरती: गावातील प्रत्येक घरातून बाप्पा विसर्जन मिरवणुकीत एकत्र येतात. संपूर्ण गाव एकत्र येऊन जेव्हा एकच महाआरती करतं, तो क्षण अंगावर काटा आणणारा असतो.एकजूट आणि समता: गावात श्रीमंत-गरीब, लहान-मोठे असा कोणताही भेद नाही. सर्वांचा बाप्पा एक आणि सर्वांचा निरोपही एकत्र!७७ वर्षांची ही शिस्त, ही भक्ती आणि ही एकजूट आजच्या पिढीनेही तितक्याच अभिमानाने जपली आहे. आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या देवरुंग गावाचा आणि आमच्या बाप्पाचा! 🌺"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!" 🔔🙏
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3437 in a hash chain of 3,444. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf5ad53923b0286db2384395fb8a29ead20301581acc4902e3f1b4893dcba7a5f
Chain head558852ff6343a842bbeac23d6c89d6392abaaf77836d8384e7d05365f1dd3ca2
The chain verifies end to end as of this page load.


