bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03423
डोहोळे ग्रामपंचायत हद्दीत पर्यावरणपूरक, समाजउपयोगी व सर्वसमावेशक गणेशोत्सव उत्साहात साजरा!..

भक्तीची जोड अन् आरोग्याचा ध्यास, डोहोळे हद्दीत रचला नवा इतिहास... " आरतीचा सूर, सोबत सेवेचे वाण, गणेशोत्सवात जपले प्रत्येक माणसाचे प्राण!" डोहोळे, कळंबोली, कोशिंबी, आन्हे आणि सोर गावात भक्तीमय वातावरण; आरोग्य शिबिर, रक्तदान-आरोग्य जनजागृती, भजन व समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल.डोहोळे ग्रामपंचायत हद्दीतील डोहोळे, कळंबोली, कोशिंबी, आन्हे आणि सोर या पाचही गावांमध्ये यंदाचा गणेशोत्सव अत्यंत भक्तीभावात, उत्साहात आणि सामाजिक भान जपत साजरा केला जात आहे.कौटुंबिक स्थापनेसोबतच सामूहिक पद्धतीने श्रींचे आगमन झाले असून संपूर्ण परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. " डोहोळे, कळंबोली, कोशिंबी, आन्हे अन् सोर, पाचही गावांत घुमला एकच भक्तीचा गजर!" नाही कुठे भेद, नाही नात्यांत अंतर, एकतेने विणला इथे संस्कृतीचा पदर...." विविध समाजउपयोगी व सांस्कृतिक उपक्रम यंदाच्या गणेशोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक विधींसोबतच अनेक समाजउपयोगी उपक्रमांवर दिलेला भर: मोफत महाआरोग्य शिबिर: उत्सवाचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी मोफत पूर्ण शरीर तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषध वाटप आणि शुगर टेस्ट यांसारख्या आरोग्यविषयक समाजउपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. " आरोग्याची सेवा हीच खरी देवपूजा, साधियला गावाने हा परोपकार दुजा...." सामाजिक व शैक्षणिक उपक्रम: कला, क्रीडा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला स्पर्धा, मंगळागौर, हळदी-कुंकू, भक्तीमय भजनांचे कार्यक्रम, हरिपाठ व महाप्रसादाचे आयोजन करून सामाजिक एकोप्याची परंपरा जपली जात आहे. " भजन-हरिपाठाने पावन झाले मन, महाप्रसादाने रंगला हा भक्तीचा सण!" शाळकरी मुलांचा सृजनशील उपक्रम आणि पर्यावरण जनजागृती शालेय विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरणाचा संदेश देत विशेष पुढाकार घेतला: पानांचा गणपती व उपक्रम: शाळेमध्ये ' आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी झाडांच्या पानांपासून गणपतीच्या सुंदर प्रतिकृती बनवल्या आणि निसर्गाचे जतन करण्याचा संदेश दिला.चित्रकला व पर्यावरण संदेश: मुलांनी गणपती बाप्पाची विविध चित्रे रेखाटून उत्सवाचा आनंद द्विगुणीत केला. " हिरव्यागार पानात हासला माझा बाप्पा, चिमुकल्या हातांनी मांडला भक्तीचा टप्पा.... निसर्गाची पूजा हीच खरी भक्ती, मुलांच्या सृ
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3433 in a hash chain of 3,450. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashdc4f1f83699308989dc02d42b6495673b75476b2cc277526ec6b691d72a8c1ed
Chain head4b0d2d067664c781092c6590026fb9fad13e7d0901ac8bc8d671e4469f90b6e2
The chain verifies end to end as of this page load.


