bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03414
*निवळी* *"गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट"*

*गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट:* एकदा पार्वती माता स्नानाला जात होती. तिला पहारा देण्यासाठी कोणीच नव्हतं, म्हणून तिने आपल्या अंगाच्या मळापासून एका सुंदर बालकाची मूर्ती बनवली आणि त्यात प्राण फुंकला. पार्वती म्हणाली - "बाळा, मी आंघोळ करेपर्यंत तू दारात उभा रहा, कोणालाही आत येऊ देऊ नकोस." तो बालक दारात उभा राहिला. त्याच वेळी महादेव - भगवान शंकर तिथे आले. त्यांना आत जायचं होतं, पण त्या बालकाने त्यांना अडवलं - "माझ्या आईने आत कोणालाही जाऊ देऊ नको असं सांगितलंय." शंकरांना राग आला. त्यांना माहीतच नव्हतं हा आपलाच मुलगा आहे. रागाच्या भरात त्यांनी त्रिशूलाने त्या बालकाचं मुंडकं उडवलं. आत पार्वतीला आवाज आला. बाहेर येऊन पाहते तर तिचा मुलगा जमिनीवर! ती खूप रडू लागली आणि खूप रागावली. मग शंकरांना आपली चूक कळली. त्यांनी लगेच आपल्या गणांना सांगितलं - "जा, उत्तर दिशेला जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मस्तक घेऊन या." गण उत्तरेला गेले, तिथे त्यांना एक हत्ती दिसला. त्याचं मस्तक आणलं आणि शंकरांनी त्या बालकाला लावलं आणि त्याला परत जिवंत केलं. आणि त्या बालकाला नाव दिलं - *गणपती, गजानन.* आणि वर दिला - आजपासून कोणत्याही शुभ कार्याच्या आधी तुझीच पहिली पूजा होईल. म्हणूनच आपण आजही म्हणतो - *गणपती बाप्पा मोरया, पहिल्या पूजेचा मानकरी!*
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3424 in a hash chain of 3,566. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash415e9dab084606ddce8b8f9f3dd5c8944e1cf17102ec419c052cd7bb0e145727
Chain headbb766519d5102ce517378828ec36016f2ecf8043104027b49e787fa1dfe6b15b
The chain verifies end to end as of this page load.


