bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03405
एकदंत
एकदा भगवान परशुराम कैलास पर्वतावर भगवान शिवांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी श्रीगणेश आपल्या वडिलांचे रक्षण करण्यासाठी द्वारावर उभे होते. परशुरामांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, पण श्रीगणेशांनी त्यांना अडवले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. परशुरामांनी रागाने आपला परशू (कुऱ्हाड) श्रीगणेशांवर चालवला. तो परशू भगवान शिवांनीच परशुरामांना दिलेला असल्यामुळे श्रीगणेशांनी त्या अस्त्राचा मान ठेवला. त्यांनी तो वार स्वतःवर घेतला आणि त्यांचा एक दात तुटला. त्या दिवसापासून श्रीगणेशांना “एकदंत” असे नाव पडले—म्हणजे एक दात असलेले.
- Kind
- Story
- Place
- Dharashiv
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3415 in a hash chain of 3,476. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6fe7b4d9adbb530642c9d1d61157c7295d5fd2266f5e60c99a7978973e4c6649
Chain headf86bc1b9214f0e255a0c327c47d0116fd7694ddd5714073d39a4e2ec30392227
The chain verifies end to end as of this page load.


