bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03386
चव्हाणांचा गणराज

पहिली कोकणात एकत्र कुटुंब पद्धती होती पण कालांतराने ती लुप्त होत गेली कुटुंबातील प्रत्येक भाऊ आपलं स्वतःच घर बंधू लागला वेगळा संसार करू लागला त्यातीलच आमचं कुटुंब . सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यात निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं श्री देव रामेश्वर रवळनाथ आणि सातेरी देवीच्या छायेत तीन तीन तळी असलेल तळगाव आणि गावडेवाडीत चव्हाण कुटुंब म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती असलेल एक घर एक घर आणि पंधरा कुटुंबे आणि एक गणपती सर्व सण एकाच घरात व्हायचे पण आता त्याच पंधरा कुटुंबाची पंधरा घरे वेगवेगळी झाली त्यात आमचं घर पण वेगळं झालं आणि एका वाडीचा जन्म झाला चव्हाण वाडी चव्हाण वाडीत गणपती जरी वेगवेगळे असले तरी नाग पंचमी आणि गौरीचा कार्यक्रम एकाच घरात होतो ज्याला आम्ही देवघर म्हणतो . माझ्या वडिलांनी बांधलेलं घर आणि तेथेगेली तीस वर्ष वेगळा गणपती पुजतो परंपरागत पद्धतीने गणपती मोठ्या थाटामाटात आणतो आणि वाडीतील सर्व गणपती दरवर्षी 11 दिवस ठेऊन त्याची मनोभावे सेवा करतो पूर्ण वाडीत 22 गणपती आहेत आणि त्यांची दररोज सर्व ग्रामस्थ मिळून आरती करणे भजन करणे हा त्यात 22 गणपतींचं एक भजन मंडळ आहे मांडदेव प्रासादिक भजन मंडळ अस त्याच नाव आहे . प्रत्येक घरात वाडीच भजन झालाच पाहिजे ही प्रथा अजूनही चालू आहे आणि ते पण मोफत त्याच बिदागी नाही . हे झालं वाडीच पण आमच्या घरात जो गणराज बसवतो त्याच नाव आम्ही चव्हाणांचा गणराज अस ठेवलं आहे कारण गणरायाच्या आगमनाची एवढी आतुरता माझ्या मनात असते की यावर्षीच विसर्जन झालं की पुढच्या वर्षी कोणती मूर्ती आणायची डेकोरेशन कोणत करायचं याची तयारी सुरू होते आणि परत बाप्पा कधी येतो ते दिवस मोजत राहायचं आणि आपलं काम करून काही पैसे जपून ठेवायचे पुढच्या वर्षीच्या बाप्पाची तयारी करण्यासाठी या वर्षी आम्ही बोक्स पकिंगचा पुठ्ठा वापरून एक छानस डेकोरेशन केलं आहे आणि जुन्या राजवाड्याचा गेट अप देण्याचा प्रयत्न केला आहे आधी एक ते दीड महिना डेकोरेशन सुरू केलं आणि बाप्पा यांच्या आधी एक दिवस संपवलं बाप्पा बघायला ऐणारे भाविक पाहुणे चाकरमानी बाप्पाच आणि डेकोरेशनच कौतुक करतात तेव्हा मनाला समाधान वाटत आणि एकांतात बाप्पाला बघत राहील की वर्षभर झालेला त्रास काही प्रसंग दुःख सर्व विसरून जातो आणि एखाद सॉफ्टवेअर जस रिफ्रेश केल्यावर सुरळीत चालत त्याच प्रमाणे आमचं जीवन पण एक वर्षा साठी
- Kind
- Story
- Place
- Sindhudurg
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3396 in a hash chain of 3,403. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashdd60ebfff937ee3dbb35d002d0baf7e96fb448a498cac8ed4a3b120a1adc032a
Chain head17a586ff5c2c6a0d4cab0d737c9ef81dff562f8bb53c8abb34f75dd70cba5fa5
The chain verifies end to end as of this page load.


