bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03383
प्रबोधनात्मक आरती
यारे या जन सारे,आरती समतेची गाऊ शिकवण बंधूत्वाची SS आपुल्या मनोमनी रुजवू || धृ || देश आमुचा विविधतेने जगात हा नटला नाना रंगी फुले उमलली बाग जणू फुलला देश उन्नतीसाठी SS सारे एकजूट होऊ || 1 || संत महात्मे या धरतीवर जन्माला आले मानवतेचा मंत्र देऊनी अमरपदी गेले विसरुन जाती पाती SS बंधूभावाने राहू || 2 || थोराची वाचूनी चरित्रे मन आपुले घडते अतुट नाते समाज जिवनासवे इथे जडते समतेचा शांतीचा SS झेंडा चहुकडे मिरवू || 3 || विकसित होई विवेकबुध्दी विद्यार्जन करीता ज्ञानासंगे कर्तत्वाचे पाऊल ही पडता धडा सहजिवनाचा विद्यामंदिरत गिरवू || 4 || उच्च कुळी जन्माला म्हणून का थोर कुणी ठरतो विचार करणी आचारणाने जगी अमर होतो समाजसेवेसाठी सारे सज्ज आता होऊ || 5 ||
- Kind
- Tradition
- Place
- Ratnagiri
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 21 September 2026
- Accepted
- 21 September 2026
Evidence
This entry is record #3393 in a hash chain of 3,404. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash703a5cf2118b718760600f7a61b6bd891f60cdfee31a53b8ef283a5bb3fa7ec8
Chain head58250108ebbe6f902894a59450c82ea48c1fab50111081c5c36b32c3cf92daeb
The chain verifies end to end as of this page load.


