bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03374
गणपती बाप्पाची पृथ्वी प्रदक्षिणा
एके दिवशी कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती बसले होते आजूबाजूलाच गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी खेळत होते खेळता खेळता त्या दोघांमध्ये भांडण झाले ते दोघे भगवान शंकर आणि माता पार्वती कडे आले. तेव्हा कार्तिक स्वामी माता पार्वतीला म्हणाले आई हा बघ ना ग माझ्या खोडी काढतोय त्यावर गणपती बाप्पा म्हणाले नाही ग आई हा दादाच माझ्या खोडी काढतोय मला खेळून देत नाही असं भांडणाचा दोघांचा सूर पाहून माता पार्वती आणि शंकर एकमेकांकडे बघून हसले आणि त्यांनी लहान मुलांची समजूत काढावी या दृष्टीने एक गंमत केली. आता तुमच्यापैकी कोणी खोडी काढली आणि कोणी नाही हे सांगू शकत नाही पण आम्ही तुम्हाला दुसरा एक खेळ देतो बघू तुम्हा दोघांना ते जमते का ते दोघे आई-बाबांचा नवीन खेळ ऐकण्यासाठी सरसावले भगवान शंकर म्हणाले हे बघा मुलांनो पृथ्वी प्रदक्षिणा करायला खूप वेळ लागतो. तुमच्यापैकी जो पहिला पृथ्वी प्रदक्षिणा करेल तो खरा. काय तयारी आहे तुमची, दोघेही पृथ्वी प्रदक्षिणा करायला तयार झाले. कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर म्हणजे मोरावर बसले आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाले. गणपती बाप्पा मात्र आपले वाहन उंदीर मामाकडे बघत बसले त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी आपल्या आई-वडिलांना वाकून नमस्कार केला आणि त्यांच्या भौति एक पूर्ण प्रदक्षिणा हात जोडून घातली, आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा त्यांना साष्टांग नमस्कार केला शंकर भगवान आणि पार्वती मतेने एकमेकांकडे समाधानाने बघितले आणि गणपती बाप्पाची प्रदक्षिणा हीच खरी पृथ्वी प्रदक्षिणा आहे . कारण आई-वडिलांच्या चरणी पूर्ण विश्व सामावलेलं असतं म्हणून आपण आपल्या आई-वडिलांचे नेहमी आदर करावा
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3384 in a hash chain of 3,393. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashadcca2771f5574b8fa24a78ee52bf871428b6d210fb241d6429d0279a123dbd1
Chain head703a5cf2118b718760600f7a61b6bd891f60cdfee31a53b8ef283a5bb3fa7ec8
The chain verifies end to end as of this page load.


