bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03365
माझा लाडका बाप्पा
माझ्या घरचा गणपती पाच दिवसाचा असतो. माझ्या घरी आमच्या कुटुंबाची गौराई येते. आम्ही सर्वजण पाच दिवस एकत्र असतो. गणपतीची गाणी नाच भजन यामध्ये आमचे पाच दिवस आनंदात जातात. माझी गौराई दीड दिवसांसाठी येते. गणपतीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या आवडता पदार्थ म्हणजे मोदक केला जातो. मनोभावे गणपतीची पूजा करून त्याची स्थापना आमच्या घरामध्ये केली जाते आणि त्यामध्ये माझ्या घरातील सर्व लहान मोठे सामील होऊन आरतीला एकत्र आनंदाने सहभागी होतात. पाच दिवस सकाळ संध्याकाळ माझं घर व्यक्तीच्या वातावरणामध्ये भरून गेलेलं असतं घराचं जसं की मंदिर होतं. गौराई ही तिसऱ्या दिवशी येते. जेव्हा गौराई येते तेव्हा तिला माठाची भाजी आणि भाकरीच्या नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गौराईचा ववसा असतो त्या दिवशी सुवासिनी माझ्या घरी येऊन माझ्या गौराईची मनोभावे पूजा करतात आणि तिची खणानारल्याने ओटी भरून संसार सुखाचा व्हावा यासाठी मनोभावे प्रार्थना करतात. त्यादिवशी आम्ही गौराईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. गौराई साठी भंडारा एक केला जातो त्यामध्ये तिचे दागिने बनविले जातात. माझा गणपती हा पाच दिवसाचा असून तो पाचव्या दिवशी विसर्जन केला जातो त्या दिवशी खूप दुःख होतं ज्या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट बघतो ते पाच दिवस जणू काही पाच मिनिटांसाठी पटकन निघून जातात. मुखी फक्त गणरायाचं नाम आणि डोळ्यांमध्ये त्याचे रूप पाहून मनाला जी शांती मिळते ती स्वर्गसुखा एवढी असते. पाच दिवस गणपती बाप्पाचे मनोभावे सेवा करून त्याला निरोप देताना कंठ दाटून येतो. पण मनामध्ये अशा असते की बाप्पा जरी आता त्याच्या घरी गेला तरी पुढच्या वर्षी तर नक्की माझ्या भेटीला येईल. या आशेने मन भरून आले असतानाही त्याला हसतच निरोप देतो. माझ्या घरातील सर्व लोक गणपती बाप्पाचा मखर अगदी आवडीने पंधरा दिवस आधी करतात.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- मु. कांबे, ता. भिवंडी, जि. ठाणे
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3375 in a hash chain of 3,397. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashcc8547e5080bfe901e5f3eb611a54b6283f587e66ca5c132f7a4b73b1d67b916
Chain head2962ba9e22b088335baca8bc242f92b41e0c6ac4c760a20847891f462213cbe7
The chain verifies end to end as of this page load.


