bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03322
Pandey Mahal cha famous Ganesha

पांडे महाल येथील प्रसिद्ध गणपती डॉ सुवर्णा हुबेकर भंडारा : पांडे महाल महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील एक वास्तू आहे. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी रायबहादूर यादवराव पांडे यांनी हा महाल बांधला होता. अठराव्या शतकात लॉर्ड हेस्टिंगच्या काळात सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी रामवहादूर यादवराव पांडे यांनी हा महाल बांधला होता. या महालाचे बांधकाम १८९६ मध्ये पूर्ण झाले. २०० हुन अधिक खोल्या असलेला हा महाल सुमारे ६० हजार वर्ग फूटमध्ये अबांधण्यात आयला आहे. या सर्व खोल्या व दिवाणखाने कलाकृतीने सजलेल्या आहे. या महालात नृत्य सभागृह तसेच पूजाघरही आहे. बेल्जियम काचेचे भव्य आरसे, झुंबर, इटालियन मार्बल टाईल्स, फवारे, सुंदर नक्षीकाम व भव्य आकर्षक बांधणी यामुळे पांडे महाल भंडाऱ्याचे भुषण आहे. आज मात्र या महालाची अवस्था अतिशय दयनीय आहे. महालाची स्थिती जीर्णावस्थेत aahe बीम पावसामुळे नष्ट होऊन काही भाग तुटून खाली पडलेला आहे. वरचा मजला नाजूक अवस्थेत असल्याने तो कधीही जमीनदोस्त होऊ शकतो. मुख्य दरवाजाने आत प्रवेश केल्यावर समोरच एका दालनात यादवराव पांडे यांचा संगमरवरी पुतळा आहे. संपुर्ण महाल फिरणे धोकादायक असल्याने केवळ पाच ठिकाणाहुन महाल पहाता येतो. याशिवाय सोबतच देवघरच्या भागात असलेल्या छपरीतील ऐतिहासिक वस्तू पहाता येतात. पुरातत्व विभागाने महालाचे सर्व्हेक्षण करून घेतले असुन सर्वेक्षणानंतर पुरातत्व विभागाने या महालला पुरातन वास्तू (हेरिटेज बिल्डिंग) म्हणून घोषित केले आहे. यादवराव पांडे इंग्रजांच्या काळात भंडारा सुभ्याचे मानद कमिश्नर होते. ७७ गावांची मालकी त्यांच्याकडे होती. नागपूरकर भोसल्यांचे ते सावकार होते. १८९८ मध्ये इंग्रजांनी पोलीस कारवाईने या महालावर मालकी मिळवली होती परंतु १९०१ मध्ये पांडे महालाचे मालकी हक्क गणपतराव पांडे यांना सुपूर्द केले गेले. पांडे परिवारही आर्थिकदृष्ट्या खचलेला असुन खाजगी मालकी हक्कामुळे पुरातत्व खात्याचे येथे फारसे लक्ष नाही. वेळीच लक्ष न दिल्यास ही वास्तु येणाऱ्या काळात नष्ट होण्याची शक्यता आहे. पांडे महालात बसणारा गणपती भंडारा शहराचा गणपती मानला जातो. Dr Suvarna Hubekar Gondia
- Kind
- Story
- Place
- Gondia
- Art
- Architecture (Vāstu-vidyā) · Kala 29
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3332 in a hash chain of 3,381. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe2ff5e2e21cf817a1d233297dec046d1df75a90be57049addae716f3894936b8
Chain headae7c04ad494293dd00c97e7c777320bb9e10c47056465b6e253087acf2051ba6
The chain verifies end to end as of this page load.


