bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03316
आमचा बाप्पा

मौजे परुळे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील आमच्या घरी आम्ही गणेशोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. गणेशोत्सव हा अतिशय पवित्र आणि जिव्हाळ्याचा सण मानला जातो. या काळात नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर गावी असणारे सर्व कुटुंबीय एकत्र येतात, ज्यामुळे घराला खऱ्या अर्थाने घरपण येते. गणपतीची पूजा अतिशय साधेपणाने पण मनापासून केली जाते. रोज सकाळी आणि संध्याकाळी होणारी आरती, घंटा आणि टाळांचा आवाज, आणि कापूर-धुपाचा सुवास यांमुळे संपूर्ण घरात एक सकारात्मक आणि पवित्र ऊर्जा निर्माण होते.बऱ्याच घरांमध्ये गणपती बाप्पाच्या सोबतीला गौरी आगमन होते. गौरीच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण दुप्पट होते. त्यांच्यासाठी खास फुलोरा आणि विविध प्रकारच्या भाज्यांचे नैवेद्य तयार केले जातात. घरचा गणेशोत्सव हा केवळ कुटुंबापुरता मर्यादित नसून, वाडीतील सर्व लोकांना एकत्र आणणारा असतो. आरतीच्या निमित्ताने शेजारी-पाजारी आणि वाडीतील लोक एकत्र येतात. एकमेकांना प्रसादाचे वाटप केले जाते, ज्यामुळे आपुलकी आणि प्रेम वाढीस लागते.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3326 in a hash chain of 3,386. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8e1d2b161ef5154c8ee7a87f93ba27a54a91137f111043edb09f55a5afca971c
Chain headccf665d4335e90cd2642a721ddea8e5ddbeab39df93218a33694ffc88df770e6
The chain verifies end to end as of this page load.


