bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03307
मंगलमूर्ती बाप्पा

आम्ही दर वर्षी गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी असा अकरा दिवसाचा गणेश उत्सव आमच्या घरी साजरा करत असतो. गणपती ची प्रतिष्ठापणे मध्ये 1 फुटापर्यंत मातीची मूर्ती, कळस, व सुपारीचा गणपती आम्ही पटावर विराजमान करून त्यांची सकाळ व संध्याकाळी दोन्ही वेळा दुर्वा, फुले व हार वाहून आरती केल्या जाते. हा नित्यक्रम अकरा दिवस केला जातो. कधी कधी बाप्पाला 8,11 किंवा 21 जुडगे तयार करून दुर्वांचे हार वाहतात व 21 मोदक Hi बनवतात. जो पर्यंत बाप्पा घरात असतात तो पर्यंत सर्व वातावर गणेशमय झालेले असते. बाप्पा नेहमीच आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात व लहान थोरांपासून सर्वांना सारखी आवड निर्माण करतात. खरंच गणेशोस्तव हा महाराष्ट्रातील प्रमुख सणापैकी सर्वात आद्य व मोठा सण मानला जातो. आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
- Kind
- Story
- Place
- Buldhana
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3317 in a hash chain of 3,318. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7c5fb1a24ed5b84dbe5c1be87843c2934fe46457501ef64e6ec4e8795bf8ea9b
Chain headf7b4b4fe2da3f9da600d299d0892dedda77183818bf099882accb1182ad185e0
The chain verifies end to end as of this page load.


