bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03300
धर्म मतलब आस्था
🌿 पर्यावरणपूरक घरगुती गणेश सजावट — संकल्पना आमच्या घरातील श्री गणेशाची सजावट ही धर्म, संस्कृती, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम आहे. श्री गणेश हे बुद्धी, विवेक, ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. सजावटीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, धर्मनिष्ठा व बलिदानातून प्रेरणा घेत धर्मरक्षणासोबत समाजरक्षणाचा संदेश मांडला आहे. “धर्मासाठी जगा, समाजासाठी झुंज द्या” या विचारासोबत स्वच्छ परिसर, सुंदर गोरेगाव आणि ‘माझा प्रभाग–माझी जबाबदारी’ यांसारखे सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. नैसर्गिक साहित्य, फुलांची सजावट आणि घरगुती पद्धतीचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भक्ती ही केवळ पूजेत नसून समाज, संस्कृती आणि निसर्गाप्रती असलेल्या कर्तव्यातही आहे, हाच या सजावटीचा मुख्य संदेश आहे. सर्व गणेशभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿 स्वच्छता • सुरक्षितता • पर्यावरण संवर्धन 🌿
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3310 in a hash chain of 3,350. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash06f646b37952706320a565a3ae1064432d7c334ed1def2466dec3df28ec44bce
Chain head2fb7ac231f7eb0c51351cd4b57cdd09f0ffa564f17a2f1e1bfaa552cf8466e00
The chain verifies end to end as of this page load.


