bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03285
मोरया गणेशोत्सव मंडळ – एकतेचा, परंपरेचा आणि आनंदाचा बाप्पा

मोरया गणेशोत्सव मंडळ, गाताडे प्लॉट, पंढरपूर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने, भक्तिभावाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो. आमच्या मंडळाची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथे धर्म, जात-पात असा कोणताही भेद न करता सर्वजण एकत्र येतात. तसेच सर्व धर्मांचे नागरिक मनापासून बाप्पाच्या उत्सवात सहभागी होतात. आमच्या गणेशोत्सवामध्ये गल्लीतील सर्व महिलांचा विशेष आणि उत्स्फूर्त सहभाग असतो. सर्व महिला एकोप्याने एकत्र येऊन दहा दिवस बाप्पाचे अतिशय सुंदर पद्धतीने स्वागत करतात. बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी तसेच विसर्जनाच्या दिवशी महिला पारंपरिक पद्धतीने विविध कार्यक्रम आयोजित करून उत्सवाची शोभा वाढवतात. मंडळाच्या वतीने दररोज दोन वेळा बाप्पाची आरती केली जाते. सकाळच्या आरतीमध्ये लहान मुले उत्साहाने सहभागी होऊन आरती करतात, तर संध्याकाळच्या आरतीमध्ये जोडप्यांच्या हस्ते आरती केली जाते. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला बाप्पाच्या सेवेत सहभागी होण्याची संधी मिळते. आमच्या मंडळातील महिला प्रेमाने आणि भक्तिभावाने स्वतःच्या हाताने प्रसाद तयार करून बाप्पासाठी घेऊन येतात. या प्रसादातून त्यांची बाप्पाप्रती असलेली श्रद्धा, तसेच एकमेकींबद्दलची आपुलकी आणि प्रेम दिसून येते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत लहान मुलांपासून महिलांपर्यंत सर्वांसाठी विविध मजेदार आणि मनोरंजक खेळांचे आयोजन केले जाते. त्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे, उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण होते. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या उत्सवाचा मनमुराद आनंद घेत असते. आमच्या गणेशोत्सवाची आणखी एक सुंदर परंपरा म्हणजे दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी आमचे मुस्लिम बांधवही उत्स्फूर्तपणे सहभागी होतात आणि प्रसादाचे वाटप करतात. त्यांच्या या प्रेमळ सहभागामुळे आमच्या उत्सवातील सर्वधर्मसमभाव, माणुसकी आणि आपुलकीची भावना अधिक दृढ होते. मोरया गणेशोत्सव हा केवळ गणपतीचा उत्सव नसून सर्व धर्मीयांना एकत्र आणणारा, महिलांचा सहभाग वाढवणारा, लहान मुलांना आनंद आणि संस्कार देणारा आणि संपूर्ण परिसरात एकोपा निर्माण करणारा उत्सव आहे. बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत प्रत्येक दिवस सर्वांच्या सहभागाने, प्रेमाने आणि आनंदाने साजरा केला जातो. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सर्वजण एकत्र येतात, हाच आमच्या मंडळाचा खरा आनंद, आमची परंपरा आणि आमचा अभिमान
- Kind
- Story
- Place
- Pandharpur
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3295 in a hash chain of 3,295. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9b37d0cb49cbc5ae46479bde1d3c263f74b56fbad33f8b98e4f6af751de2fb20
Chain head9b37d0cb49cbc5ae46479bde1d3c263f74b56fbad33f8b98e4f6af751de2fb20
The chain verifies end to end as of this page load.


