bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03258
उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळ

स्वातंत्रसैनिक कै. बाळू चांगु पाटील (मास्तर )यांनी १९४७ ला मंडळाची स्थापना केली आहे. आणि उमरखाडीचा राजा हा नवसाला पावणारा आहे जो तीन तिठ्या वर विराजमान आहे, जी आज मला एक साळुंखे परिवाराकडून (तांबवाला बिल्डिंग )असे माहित पडलेकी त्यांच्या आई ला लग्न होऊन ३५ वर्ष झाले तरी मुलं होत न्हवतं व त्यांच्या आई ने गणपती उत्सवात आपल्या लाडक्या नवसाला पावणाऱ्या उमरखाडीच्या राजा जवळ येऊन नवस केला कि तू खरंच नवसाला पावणारा उमरखाडीचा राजा असशील तर मला तुझ्या सारखा अगदी गोड मुलगा देशील आणि खरंच आपल्या राजाने त्यांचा नवस पूर्ण केला आणि त्याच वर्षी त्या आई गरोदर राहिल्या आणि त्यांना मुलगा झाला आणि तो मुलगा आज ६६ वर्षाचा आहे, आणि ते बाबा प्रत्येक वर्षी त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या पूर्ण परिवारासोबत आपल्या उमरखाडीच्या राजाच्या दर्शनाला अगदी न चुकता येतात हे ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला मला पण खुप बरं वाटलं कि माझा उमरखाडीचा राजा हा नवसाला पावणारा राजा आहे... आपला नम्र, श्री. मनोज प्रभाकर तांडेल (अध्यक्ष ) उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मंडळ.
- Kind
- Story
- Place
- गणेश चौक, उमरखाडी मुंबई -4000 09
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3268 in a hash chain of 3,351. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3bd36fa4a65f746fc96e4779c3fce99049562341dbdf48d8424785a0a5565101
Chain head39a57f57f528a261c701eb7bc911bedbc4c844ec79b629a1b101ed6b878c156a
The chain verifies end to end as of this page load.


