bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03255
आमच्या घरातील गणपती बाप्पाच्या आगमनाची सुरुवात
ॐ गं गणपतये नमः! 🙏🌸 माझे पती श्री आनंद भगवान ढोबळे हे लहान असतांना त्यांना टायफाईड झालेला. त्या आजारातून ते लवकर बरे होण्यासाठी माझ्या सासूबाई श्रीमती लीला भगवान ढोबळे यांनी देवाकडे नवस बोलल्या की, माझ्या मुलाला या आजारातून लवकर बरे कर. मी गणपती बाप्पाची मूर्ती माझ्या घरात मांडेल आणि गणपती बाप्पाला २१ करंज्या व १० पात्या (पुरी) असे एकूण 21 करंज्या पात्याचा फुलोरा बांधील.. ती परंपरा अजूनही आमच्याकडे सुरू आहे.. गणेश उत्सवादरम्यान आमच्याकडे बाप्पाला रोज घरी केलेल्या फुलांचा हार, दुर्वा, नैवेद्य, 21 मोदक अर्पण केले जातात. नंतर आरती करून प्रसाद वितरण होते.. र्माझे पती आज रोजी 5४ वर्षाचे आहेत. सुदृढ आहेत निरोगी आहेत. बाप्पाच्या कृपेने आमच्या घरी सुख, समृद्धी, शांती, समाधान, सकारात्मकता व नैतिकता नांदते आहे. बाप्पाची कृपादृष्टी सदैव माझ्यावर, माझे पती आनंदवर, माझी मुले कुशल व रिद्धीवर व माझ्या संपूर्ण कुटुंबावर बरसते आहे.. गणपती बाप्पा तुझ्याकडे माझे मागणे आहे की, 🙏 तू सगळ्यांचे मंगल कर.. कल्याण कर .. आम्हाला सद्बुद्धी दे.. सद्विवेकाने विचार करण्याची शक्ती दे.. सत्कर्माच्या मार्गावर, धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी आम्हाला मदत कर. सगळ्यांना सुखात ठेव. मला व माझ्या कुटुंबाला या जगाच्या, विश्वाच्या कल्याणाच्या दृष्टीने कार्य करण्या साठी शक्ती, बुद्धी, विद्या प्रदान कर, देवा...!!🙏🙏🌸💮🏵️ बाप्पा तुझी सदैव आमच्यावर व पुढे जन्माला येणाऱ्या माझ्या पिढ्यांवर तुमची कृपादृष्टी दृष्टी असू द्या. नमस्कार स्वीकार करा देवा!! गणपती बाप्पा मोरया..!! मंगलमूर्ती मोरया..!!🙏😘❤️
- Kind
- Story
- Place
- Nagpur
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3265 in a hash chain of 3,351. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3aecd95300eb8ffca0c6f907db5ea1674dab35b2ff6a262c2444def32c372652
Chain head39a57f57f528a261c701eb7bc911bedbc4c844ec79b629a1b101ed6b878c156a
The chain verifies end to end as of this page load.


