bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03216
H east ward
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त, एच/पूर्व विभागामार्फत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी गोवदेवी पोलीस चौकी रोड, सांताक्रूझ (पूर्व) येथे कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. गणेशभक्तांच्या सोयीचा विचार करून चार फुटांपेक्षा कमी उंचीच्या तसेच चार ते सहा फूट उंचीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेमुळे विसर्जन प्रक्रिया अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडण्यास मदत होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व गणेशभक्तांना या कृत्रिम विसर्जन तलावांचा जास्तीत जास्त वापर करून स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत आहे.
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3226 in a hash chain of 3,289. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9156504af79146a2af11ac415a2f5f1fffe37da27a2172fbdaf54df7a01127e6
Chain headf6af9fb6036f262e6c93b9849ec23f74828c007a28b05e2a255e040058b003a3
The chain verifies end to end as of this page load.


