bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03166
गौरी व गणपती बाप्पा
गणेश चतुर्थीला गणेश उत्सव चालू होतो. त्यानंतर चार दिवसांनी गौरी आगमन होते पाचव्या दिवशी गौरीचे पूजन होते सहाव्या दिवशी गौरी विसर्जन होते. त्यानंतर नित्यनेमाने सकाळी संध्याकाळ गणपती बाप्पाचे आरती करून गणपती उत्सव साजरा केला जातो व मोठ्या भक्ती भावाने अनंत चतुर्थीला गणपती विसर्जन केले जाते. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या वेळी पायांचे ठसे उमटवून गौरीला तुळशी वृंदावनापासून घरात आणले जाते गजरा तिला आत घेतले जाते तसेच इयत्ता सांग पूजन करून तिची स्थापना केली जाते तसेच गौरीच्या दुसऱ्या दिवशी गौरीचा श्वास शृंगार करून तिला वेगवेगळ्या खिरापतींचा नैवेद्य दाखवला जातो तसेच नैवेद्य असतो व संध्याकाळी हळदी कुंकवाचा मोठा कार्यक्रम केला जातो त्यामध्ये गावातील सुवासिनी एकमेकींच्या घरी जाऊन गौरीचा आशीर्वाद घेत असतात तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी गौरीची पूजा आरती करून हळदी कुंकवाने मागलेल्या दोऱ्याने गाठी घेतल्या जातात व सुख समृद्धीचे सौभाग्य सौभाग्य याचे आकांक्षा करतात व गौरीच्या विसरजन करतात
- Kind
- Tradition
- Place
- Satara
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3176 in a hash chain of 3,181. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash98c68c9788117984fd04a149067152d541ccce3ea4857586fc2077ef2073c36d
Chain headff8a16385e629facf32998f907aa4b3b0eec550369ee4992e42018dbc7779e7e
The chain verifies end to end as of this page load.


