bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-03085
🌺 आमच्या घरचा गणपती — महाराष्ट्राशी जोडलेली भक्तीची परंपरा 🌺

आम्ही मूळचे राजस्थानी. आमचे आजोबा त्यांच्या तरुणपणी साधारणता: १९४० साली महाराष्ट्रात स्थायिक झाले आणि तेव्हापासून आमचे कुटुंब महाराष्ट्राच्या संस्कृतीशी मनापासून जोडले गेले. सुरुवातीला विदर्भात वास्तव्य केल्यानंतर सध्या आम्ही मुंबईत वास्तव्यास आहोत. राजस्थानमध्ये सर्वसाधारणपणे घरोघरी गणपती बाप्पांची स्थापना करण्याची परंपरा आढळत नाही. मात्र, महाराष्ट्रात आल्यानंतर आमच्या कुटुंबाने गणेशोत्सवाची ही सुंदर परंपरा स्वीकारली आणि तेव्हापासून आमच्या घरी दरवर्षी गणपती बाप्पांची भक्तिभावाने स्थापना केली जाते. बाप्पांचे आगमन होताच घरातील वातावरणच बदलून जाते. आरती, पूजा, प्रसाद, नैवेद्य आणि कुटुंबातील सर्वांची लगबग यामुळे दहा दिवस घर अक्षरशः भक्तिमय होऊन जाते. या दहा दिवसांत नातेवाईक, मित्रमंडळी आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतात. बाप्पांच्या सान्निध्यात आनंद, समाधान आणि सकारात्मकतेचा अनुभव येतो. सर्वात विशेष म्हणजे हे दहा दिवस कधी सुरू झाले आणि कधी संपले, हे कळतही नाही. विसर्जनाच्या वेळी मनात एकच भावना असते—“बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!” राजस्थानची मुळे आणि महाराष्ट्राची संस्कृती, या दोन्हींचा सुंदर संगम आमच्या कुटुंबाच्या गणेशोत्सवात अनुभवायला मिळतो. महाराष्ट्राने आम्हाला केवळ आपलेसे केले नाही, तर गणपती बाप्पांच्या भक्तीची ही सुंदर परंपराही आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवली. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏🌺
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- राकेश पुरुषोत्तम जोशी
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #3095 in a hash chain of 3,280. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2c319406c42568ed90590b5f2a1da3ebc197342be2b4e52462859f616f78c5ce
Chain head494696b96f0a44b8660b73001a41b726507b1e2b91750b9dcfc5878e50fb074d
The chain verifies end to end as of this page load.


