bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02902
इकोफ्रेंडली चा राजा

इकोफ्रेंडलीचा राजा 👑 गेली १८ वर्षे… पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, सामाजिक संदेश आणि निसर्ग संवर्धनाचा एक छोटासा प्रयत्न! 🌱 आमच्या सजावटीमध्ये टाकाऊ पुठ्ठे, कागद, नारळाची किशी, शाडू माती, पाने, भाताच्या पेंढ्या आणि अशा विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला जातो. निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवून, सर्जनशीलतेतून सामाजिक संदेश पोहोचवणे हेच आमचे ध्येय! 💚 २०१० ते २०२६ — १७ वर्षांच्या संकल्पनांचा प्रवास ✨ 🌴 २०१०: अखंड नारळ आणि नारळाच्या झाडाच्या विविध भागांपासून साकारलेले गणपती बाप्पा. 🌿 २०११: सुपारीच्या झाडाच्या इरीपासून बाप्पाची मूर्ती, रथ आणि रथाचा सारथी उंदीरमामा. 🌍 २०१२: लाकडाच्या भुश्यापासून साकारलेले बाप्पा — पृथ्वीचे पर्यावरणीय संकटांपासून संरक्षण करण्याचा संदेश. 🌱 २०१३: मोरपंखी झाडाच्या पानांपासून साकारलेली १० फुटी गणेशमूर्ती — झाडे लावा, निसर्ग वाचवा! 🍃 २०१४: वडाच्या पानांपासून साकारलेले उंदीरमामा आणि त्यावर विराजमान झालेले १० फुटी गणपती बाप्पा. 🥥 २०१५: नारळाची किशी व झापांचा वापर करून साकारलेली १० फुटी कृष्णावतारातील गणेशमूर्ती. 🏛️ २०१६: गणपतीपुळे मंदिराचा देखावा — बेटी वाचवा, भ्रूणहत्त्या थांबवा! 🌾 २०१७: भाताच्या पेंढ्या व तांदळाचा वापर करून गरुडावर विराजमान झालेली १० फुटी गणेशमूर्ती. ♻️ २०१८: मानवनिर्मित प्लास्टिकरूपी राक्षसाचा वध करणारी शुंभापासून साकारलेली १० फुटी मूर्ती व देखावा. 💧 २०१९: फणसाच्या पानांचा वापर करून साकारलेली मत्स्यावतारातील मूर्ती — जलप्रदूषण थांबवा! 🌿 २०२०: तांदळाचा वापर करून साकारलेला बाप्पा व देखावा — कोरोनाविरुद्ध आयुर्वेदाचा संदेश. 🙏 २०२१: कोविड योद्ध्यांना मानाचा मुजरा — केळीची पाने, फणसाची पाने इत्यादींच्या वापरातून साकारलेला कोरोना मर्दन करणारा बाप्पा. 🤝 २०२२: सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा १० फुटी दहीहंडीचा देखावा. 🇮🇳 २०२३: भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलाला मानाचा मुजरा करणारा विशेष देखावा. 🌴 २०२४: कल्पवृक्ष अर्थात नारळाच्या झाडाच्या विविध भागांचा वापर करून कमळामध्ये विराजमान झालेली १० फुटी गणेशमूर्ती. 📚 २०२५: मराठी शाळा आणि पडझड झालेल्या शाळा वाचवण्यासाठी बाप्पाकडे साकडे घालणारा देखावा. 🔱 २०२६: वाढत्या निसर्गाच्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी महादेवाच्या पिंडीतून प्रकट झालेला बाप्पा
- Kind
- Tradition
- Place
- Ratnagiri
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2904 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7eae82175d1a127c286e0e09f1307d70841d3353da7fa9bde367d0b56f800bd5
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


