bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02881
संगीता घोंगडे, सहाय्यक महसूल अधिकारी, प्रांत कार्यालय अमळनेर यांच्या घरचे 2 गणपती
आमच्या घरी 2 गणपती स्थापना आहे. मागचा वर्षीचा गणपती बुडवत नसतो त्याची वर्ष भर पूजा, सेवा केली जाते, मग गणेश चतुर्थीला भाद्रपद मधील चतुर्थी ला नवीन गणपतीची शाडू मातीची मूर्ती आणून तिची व मागील वर्षीच्या मूर्तीची स्थापना पाटावर करून पूजा केली जाते. नैवेद्य टरकलपदार्थ आणि बुंदीचा लाडू, मोदक, भेंडीची भाजी, गवारची भाजी, पोळी, वरण भात नैवेद्य देतो, आणि घरीच जुन्यया मागचा वर्षीच्या गणपतीचे टप मध्ये पाणी भरून विसर्जन करतो. ती 2 तासात पाघळून जाते कारण ती शाडू मातीची असते. ती माती झाडांना टाकून देतो. ह्या वर्षीच्या गणपतीची वर्ष भर पूजा करतो सेवा करतो. पुढच्या वर्षी परत नवीन गणपती शाडू मातीचा आणून त्याची व मागील वर्षीची गणपतीची स्थापना करून मागच्या वर्षीच्या गणपतीचे विसर्जन करतो.
- Kind
- Story
- Place
- Jalgaon
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2891 in a hash chain of 2,891. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf960b1617f40b1a75d655812ebbeb58d42c003daaa98d6c9fd92b79283019848
Chain headf960b1617f40b1a75d655812ebbeb58d42c003daaa98d6c9fd92b79283019848
The chain verifies end to end as of this page load.


