bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02841
डॉटम चा राजा

मी मंगेश सुरेश मयेकर, सध्या डॉटम इस्ले, जनकल्याण नगर, मालाड पश्चिम इथे राहत आहे. आमच्या इमारतीमध्ये दुसऱ्या वर्षी आमच्या आवडत्या बाप्पा चे 5 दिवसाकरिता आगमन झाले होते. आम्ही सर्वांनी 5 दिवस मनोभावे पूजा, आरती, जागरण मोठ्या आनंदाने केले. इमारतीमधील सभासदांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले, लहान मुलांसाठी चित्रकला, वेशभूषा स्पर्धा आयोजित केली सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला... शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी आवडत्या बाप्पा ला निरोप द्यायचा होता, आम्ही सर्वांनी जड अंतकाराने आमच्या बाप्पा ला मनपा पी नॉर्थ विभागाने तयार केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जित केले... पी नॉर्थ विभागाने उत्कृष्ट विसर्जन स्थळी उत्कृष्ट उपाययोजना केली होती, सर्व मनपा अधिकारी सहकार्याने वागत होते, धन्यवाद मनपा पी नॉर्थ विभाग🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2851 in a hash chain of 2,890. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9e4c9d8293c5720bcfc8be48957f425b0980533e0e1a06f9684ecbb7c1df0984
Chain head7476f27a50a0338fee53808382e386549e6e6b9a845c915af9d450deaa712b9e
The chain verifies end to end as of this page load.


