bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02821
बाप्पा... जगण्यासाठी puresa
🙏नमस्कार 🙏 माझ्या वाचनात आलेली एक चांगली,विचार करायला लावणारी पोस्ट. •❅•●○┈┉꧁ *‘कथास्तू’* ꧂┉┈○●•❅• *बाप्पा— जगण्यासाठी पुरेसा! * काल कृत्रिम विसर्जन तलावावर रिमझिम पावसात एक आजी आजोबा दिसले… आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या सोबत आणखी कुणी नव्हतं. तिथला एक कार्यकर्ता ते पाहून चटकन पुढं झाला… आजोबांच्या हातात असलेल्या पाटावरच्या गणपतीला बाजूला ठेवलेल्या टेबलावर ठेवण्यासाठी. आजींनी त्या मुलाला थांबवलं… _“अरे त्यांना एकट्यानं करू दे. सगळं हौसेने करायला आवडत त्यांना!” _आजोबांनी हातातल्या बाप्पाला अलगदपणे टेबलावर ठेवलं आणि ते आजींना म्हणाले, _“आरतीचं ताम्हन तयार कर आणि झांजा काढ.” _ आजींनी पिशवीतून ताम्हन आणि थोडंसं तूप घालून आणलेलं निरांजन आणि उदबत्ती असं सगळं बाहेर काढलं. निरांजन लावून ताम्हन आजोबांच्या हातात दिलं. आजोबांनी आरती म्हणायला सुरुवात केली आणि आजींनी झांज वाजवायला. एव्हाना तिथं आलेले काही भाविक कौतुकाने पुढं येऊन आरती मध्ये सहभागी झाले. दोन-चार आरत्या म्हणून आजोबा थांबले. बाप्पाच्या पाटावर डोकं टेकवताना आजोबांचे डोळे पाणावले.आजींनी तबक आणि बाकी साहित्य परत पिशवीत ठेवलं. _“तो तेवढा मोबाईल काढ बरं पिशवीतून आणि ह्यांना दे, बाप्पा सोबत आपला फोटो काढायला…”_ आजोबा आजीला म्हणाले. आजींनी तो मोबाईल माझ्या हातात दिला. मी फोटो काढून आजोबांना दाखवला. आजोबा खुष झाले. _“तुम्हाला शक्य असेल तर विसर्जन करतानाचा छोटासा व्हिडिओ काढाल का?” _ आजोबांनी मला विचारलं. _“का नाही आजोबा. काढतो मी व्हिडिओ.” _ मी म्हणालो. आजोबांच्या चेहरा उजळला. त्यांनी टेबलावरचा बाप्पाचा पाट उचलला आणि हळूहळू पावलं टाकत ते विसर्जन तलावाच्या दिशेनं निघाले.आजी आणि मी त्यांच्या मागोमाग. तलावाजवळ कार्यकर्त्यांच्या हातात तो पाट ठेवत त्याला म्हणाले, _“सांभाळून कर बाबा सगळं…!” _ असं म्हणून आम्ही उभे होतो त्या बाजूला आजोबा आले. मी विसर्जनाचा व्हिडिओ काढला आणि मोबाईल त्यांच्या हातात दिला. मोबाईल घेताना आजोबांचा हात थरथरत होता. मी आजोबांचा हात धरून म्हणालो, _“थोडा चिखल झालाय इथं पावसामुळं. मी तुम्हाला मुख्य दरवाज्यापाशी सोडतो.” _ आता मात्र आजोबांनी विरोध केला नाही आणि त्यांनी शांतपणे माझ्या सोबत पावलं टाकायला सुरुवात केली. आमच्या मागून आजी येत होत्या.प्रवेशद्वाराजवळच्या टेबलापाशी आलो आणि आजोबा आजींना म्हणाले, _
- Kind
- Story
- Place
- Sangli
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- सतीश जाधव
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2821 in a hash chain of 2,850. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5fe443fd58c073421c78d144b92767dcdc6bcac0f1f5dc3c5ca929965fe11e92
Chain headdea280432ddef113aaf18894f6dd2bf8519789c75e590701441978db95c345f1
The chain verifies end to end as of this page load.


