bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02670
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी एच/पूर्व विभागाची कृत्रिम तलाव सुविधा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त, एच/पूर्व विभागामार्फत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी चेतना महाविद्यालयाजवळ, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नजीक, वांद्रे (पू) येथे कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. गणेशभक्तांच्या सोयीचा विचार करून चार फुटांपेक्षा कमी उंचीच्या तसेच चार ते सहा फूट उंचीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी स्वतंत्र कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेमुळे विसर्जन प्रक्रिया अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडण्यास मदत होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व गणेशभक्तांना या कृत्रिम विसर्जन तलावांचा जास्तीत जास्त वापर करून स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत आहे.
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2680 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe779563f83a20e9dd8c3ffd998354cbbc344066ca80efad7c964c7614d4130e3
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


