bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02643
आमच्या ताईचा गणपती बाप्पा

माझी छोटी 7 वर्षाची मुलगी स्वरा गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर गणपती बघण्यासाठी खूप उत्सुक.... गणपतीचे श्लोक तोंडपाठ गणपतीची आरती तोंडपाठ तिने तर मागील वर्षे हट्ट धरला पप्पा आपल्या घरी आपण आपला बाप्पा आणायचा आम्ही पण तिचे पूर्ण थोडेसे हसण्यावरच नेले पण तिचा हट्ट कायम होता आम्हाला काय करायचे सुचेना तेव्हा आमच्या नातेवाईकातील काही जाणकार मंडळींनी आम्हाला सुचवलं गणेश बाप्पा घरी यायचं म्हणतोय. तो मुलीच्या तोंडून बोलतोय मग आणायला काय हरकत आहे तेव्हापासून म्हणजे मागील वर्षापासून आमच्या घरी गणरायांच आगमन होतो. हे वर्ष आमचं दुसरं वर्ष. कालच आमच्या घरगुती गणेशाचे विसर्जन करून आम्ही घरी आलो. माझी मुलगी बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर घरी या. माझ काही चुकलं असेल तर माफ करा अस सांगून रडतच घरी आली एवढा तिचा गणरायावरचं अतूट प्रेम सकाळ संध्याकाळ मनोभावे पूजा करावी. गणेशाच चित्र काढून रंगवावे. गणपती पुढे रांगोळी काढावी. मोदक बनवण्यात मदत करावी. गणेशाशी निरागसपणे बोलावे.असा तिचा नेहमीचा ठरलेला असायचा. पण गणरायाच्या आगमनाने आमच्या घरी जो सहा दिवस उत्साहाचा वातावरण होता. खरोखरच खूप सुंदर. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
- Kind
- Story
- Place
- Satara
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2653 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashfb064b45cdc0b6d4442496131b01e25eb30bc2429a392452449b16eccb04c6ad
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


