bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02635
Mumbai Policancha Raja che Darshan

॥ श्री गणेशाय नमः ॥ गणपती बाप्पा म्हणजे श्रद्धेचे, संस्कारांचे, एकतेचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक. श्री गणरायाच्या आगमनाने प्रत्येकाच्या मनात नवचैतन्य निर्माण होते आणि समाजाला एकत्र आणणाऱ्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीला सेवाभावाची जोड मिळते. याच उदात्त भावनेतून गेली अनेक दशके *“मुंबई पोलीसांचा राजा – वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ”* आपली समृद्ध परंपरा जपत समाजहिताचा वसा पुढे नेत आहे. *सन १९४९* मध्ये सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय भावना, धार्मिक परंपरा आणि समाजसेवा या उदात्त उद्देशांनी स्थापन झालेल्या या मंडळाने गेल्या ७७ वर्षांत भक्ती, संस्कार आणि समाजहित यांचा सुंदर संगम घडविला आहे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव न मानता तो समाजाशी जोडलेला एक प्रभावी सामाजिक उपक्रम आहे, या विचारातून मंडळाने धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविले आहेत. *“मुंबई पोलीसांचा राजा”* ही ओळख केवळ एका गणेशमूर्तीची किंवा उत्सवाची नसून, ती श्रद्धा, शिस्त, सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची ओळख आहे. मुंबई पोलीस दलाच्या शिस्तीचे, सेवाभावाचे आणि लोकाभिमुख कार्याचे प्रतिबिंब मंडळाच्या विविध उपक्रमांतून उमटताना दिसते. “भक्ती, सेवा, शिस्त आणि समाजहित” या चतुःसूत्रीवर वाटचाल करणारे हे मंडळ आज असंख्य भाविकांच्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. मंडळाच्या सामाजिक कार्याचा आवाका दिवसेंदिवस विस्तारत आहे. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, अन्नदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, करिअर मार्गदर्शन, महिला सक्षमीकरण, युवक प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा तसेच पर्यावरण संवर्धनासारख्या विविध उपक्रमांतून “समाजसेवा हीच खरी गणेशभक्ती” हा संदेश जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. २०२६ हे मंडळाच्या ७७ व्या वर्षाचे विशेष पर्व आहे. या वर्षीची स्मरणिका म्हणजे केवळ कागदावर जतन केलेली माहिती नसून, गेल्या अनेक वर्षांच्या कार्याचा, असंख्य कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचा, स्वयंसेवकांच्या समर्पणाचा, देणगीदारांच्या योगदानाचा आणि भाविकांच्या अखंड श्रद्धेचा दस्तऐवज आहे. मंडळाच्या वर्षभरातील कार्याचा आढावा, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक कार्य, महिल
- Kind
- Story
- Place
- Mumbai
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2645 in a hash chain of 3,280. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash559433ad380d97b1aec4c7b2896ad97cbe026a3ad0c08c64613064662ca509d8
Chain head494696b96f0a44b8660b73001a41b726507b1e2b91750b9dcfc5878e50fb074d
The chain verifies end to end as of this page load.


