bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02594
Bappa che

शिव पार्वतीच्या सदनी गणपती आलेला आहे. शिव पार्वतीच्या पोटी आलेला नाहीये. पार्वतीच्या अंगमाळापासून तो गणपती पार्वतीने बनवलेला आहे. मग आता प्रश्न पडतो की पार्वतीच्या अंगावर एवढा मळ कसा होता? तर ती काही अंघोळ करत नव्हती का? तर तसं नाही. पार्वती म्हणजे जगदंबा आहे, आदिशक्ती आहे. तिनी उपासना केली गणेश तत्त्वाची. त्या गणेश तत्त्वापासून त्यांनी तिला वर्धान दिले, घरी मी येईल आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. त्याप्रमाणे पार्वती जगदंबेने आपल्या आंगावरचा मळ वगैरे नाही. तर ते जे नऊ कोटी देवांचं तेज होतं ते सगळं ओढून ओढबाडून काढून त्याचा गोळा तयार केला आणि त्यात पूर्ण ब्रह्म गणेश तत्त्व हे जागृत झालं, गणपती तयार झाला. तो गणपती म्हणजे आपण दर वर्षी बसवतो, तो गणेश उत्सव आहे.
- Kind
- Story
- Place
- Jalgaon
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2604 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashde7ae01b4fde3e37383373e4dde1b2b0c4577a473d8a3b2f73583fc43bc69969
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


