bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02574
Majha ganeshotsav anubhav
खरं सांगायचं तर, माझ्यासाठी गणेशोत्सव म्हणजे एक वेगळीच feeling आहे. बाप्पा घरी येणार म्हटलं की घरातली सगळी तयारी सुरू होते... कोणी decoration करत असतं, कोणी प्रसादाची तयारी करत असतं, आणि घरात एक वेगळाच उत्साह असतो. मला personally सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं. सकाळची आरती, बाप्पासमोर बसून केलेल्या गप्पा, आईच्या हातचे मोदक... आणि हो, मोदक कितीही खाल्ले तरी कमीच वाटतात! 😅 आणि या सगळ्याात एक गोष्ट जाणवते— आपण वर्षभर कितीही busy असलो, पण बाप्पाच्या दिवसांमध्ये सगळे पुन्हा एकत्र येतो. म्हणूनच माझ्यासाठी गणेशोत्सव फक्त एक सण नाही... तो माझ्या घराचा, माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या आठवणींचा एक सुंदर भाग आहे. आणि बाप्पाला निरोप देताना थोडं वाईट वाटतं... पण मनात एकच असतं— "बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या!" ❤️
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2584 in a hash chain of 3,281. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashde13c590a069b8977583fba2c44beb285a5441c8fd59932e3897cb205aa505ec
Chain head2e4ced2e5dc7599090ca0d1ba0be0e84b0094938910de8acc2f135939200253a
The chain verifies end to end as of this page load.


