bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02570
ग्रामपंचायत गुंदवली

एक गाव एक मिरवणूक गुंदवली गावाची एक परंपरा गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकांमध्ये कर्णकर्कश संगीत, चित्रपट गीतांवरील धांगडधिंगा आणि प्रचंड वाहतूक कोंडी असे चित्र सामान्य झाले असताना, गुंदवली गावात अनेक ठिकाणच्या भागात मात्र ही संस्कृती अजूनही एका अतिशय पवित्र आणि शिस्तबद्ध रूपात टिकून आहे. वाढत्या नागरीकरणाच्या आणि आधुनिकतेच्या काळातही शहरातील विविध ग्रामीण भागांत पारंपारिक पद्धतीनेच विसर्जन मिरवणुका काढण्याची सुंदर संस्कृती जपली जात आहे. शनिवारी गुंदवली गावांमध्ये 'एक गाव, एक मिरवणूक' हा स्तुत्य उपक्रम राबवत गणरायाला आणि गौराईला अत्यंत भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. या सोहळ्यातून गावकऱ्यांमधील दृढ सामाजिक एकोप्याचे आणि सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडले. विशेषतः गावात 'ग्रामपंचायत गुंदवली' यांच्या पुढाकाराने 'एक गाव, एक मिरवणूक व एकच सामुदायिक आरती' हा उपक्रम अत्यंत निष्ठेने राबविला जात आहे. यंदाही हीच परंपरा कायम राखत श्री गावदेवी गंगामता मंदिर येथून एकाच वेळी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि गणेश गीतांच्या सुरात विसर्जन आरती सुरुवात झाली. गल्लीबोळांतील प्रत्येक गौरी-गणपती एकापाठोपाठ एक या रांगेत निघालेल्या मिरवणुकीत सहभागी होत गेले. विसर्जनापूर्वी गावच्या गुंदवली गणेश घाट वर पडलेल्या एकाच सामुदायिक आरतीमुळे संपूर्ण परिसरात अभूतपूर्व भक्तिमय वातावरण तयार झाले होते. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
- Kind
- Story
- Place
- Gundavali bhiwandi
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 20 September 2026
- Accepted
- 20 September 2026
Evidence
This entry is record #2580 in a hash chain of 2,580. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf96d9eabea78f93bb69b2cb459a93c14e26f2df19515ed04d31f89010445fa46
Chain headf96d9eabea78f93bb69b2cb459a93c14e26f2df19515ed04d31f89010445fa46
The chain verifies end to end as of this page load.


